आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

लखमराजे भोसले, जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन….

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. ११ सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक पर्यटन महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमास सावंतवाडी राजघराण्याचा सक्रिय पाठिंबा असेल, यांच्याकडून पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य आहेत. असे मत सावंतवाडीचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी मानले.

आज राजवाड्यात महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचीव अँड. नकुल पार्सेकर, जिल्हा उपाध्यक्ष डि. के. सावंत व सावंतवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष जितेंद्र पंडित यांनी युवराज लखमराजे व सौ. श्रध्दादेवी भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

आजच्या बदलत्या परिस्थिती जग वेगाने बदलत आहे ,अशावेळी आपण सगळ्याच घटकानी व्यापक विचार केला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर देश विदेशातील पर्यटक यायला हवे. तर त्यासाठी योग्य नियोजन करून त्याची अमंलबजावणी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन युवराज लखमराजे यांनी केले. सावंतवाडी शहरात त्या द्रुष्टीने काही पर्यटन पुरक छोटेमोठे प्रकल्प आणता येतील का? यावरही सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी लखमराजे यांनी आपला सक्रीय पांठिबा दिला असून, परस्पर सहकार्यानेच हे घडू शकते.असा विश्वासही त्यानी व्यक्त केला. सावंतवाडी संस्थानच्या अकराव्या पिढीचं नेतृत्व करताना, आजच्या परिस्थितीनुसार लखमराजे यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमीकेचं महासंघाच्या पदाधिकाऱ्यानी स्वागत केले असून राजघराण्याच्या सहकार्याने काही लक्षवेधी काम करण्याचा महासंघाचा इरादा आहे.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!