कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ गुटखा विक्री केल्या प्रकरणी अन्न व भेसळ विभागाने दोडामार्ग येथे ताब्यात घेतलेल्या तिघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१०:-  गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोडामार्ग येथे अन्न व भेसळ विभागाने ताब्यात घेतलेल्या तिघा जणांना आज सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आले आली.अजित आप्पा गवस वय ३८ रा. बोडदे भेडशी, एजाज निस्सार पटेल वय .२९ रा.बाहेरचावाडा सावंतवाडी,नारायण जयवंत चांदेरकर वय.४८ रा.बाजारपेठ दोडामार्ग अशी त्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की ,त्यांच्यावर आज सकाळी कारवाई करण्यात आली होती. यात तिघांकडून तब्बल २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.दरम्यान आज सायंकाळी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी सरकारी वकील श्री. परमार यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.तर संस्थेतर्फे सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!