“जागतिक महिला दिन” हा वेगळ्या पद्धतीने साजरा…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. १०“जागतिक महिला दिन” हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब, सावंतवाडीने फ्रंट लाइन वर्कर्ससाठी अर्थात सावंतवाडी व बांदा पोलीस ठाण्याचे महिला पोलिस कर्मचारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी डी. वाय. एस. पी. डॉ. रोहिणी सोळुंखे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. रोहिणी या स्वतः MBBS असल्याने महिलांचे शारीरिक समस्यांची जाण असल्याने रोटरी क्लब, सावंतवाडीनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे कौतुक केले. ए. पी. आय. स्वाती यादव यांनीही यावेळी उपस्थित राहून महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
या महिला पोलिस कर्मचार्यांसाठी बीपी, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, विनामूल्य सोनोग्राफी तपासून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी औषधोपचार दिले. या कार्यक्रमाच्या निमित्याने उपस्थित राहीलेल्या इनरव्हील सदस्या सौ. विद्याताई करंदीकर यांचा वाढदिवसही साजरा केला आणि इनरव्हील सदस्यांसाठी आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर आणि विनामूल्य सोनोग्राफी देखील केली. डी. वाय. एस. पी डॉ. रोहिणी सोळुंखे यांनी यशराज रुग्णालयाच्या कर्मचार्यांचे आभार मानले. क्लबचे सचिव रो. दिलीप म्हापसेकर यांनी कमवत्या स्त्रीयांना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते. अर्थात काही गुण हे उपजतच स्रीयांमध्ये असल्याने हे सर्व निभावत नेतात. हे सांगुन समस्त स्री वर्गाचे अभिनंदन केले आणि कृतन्यता व्यक्त केली. सर्व स्त्रीयांना डी. वाय. एस. पी. डॉ. रोहिणी सोळुंखे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात आली.
तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्याने रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने आहार तज्ञ रो. विनया बाड आणि रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो. डॉ. राजेश नवांगुळ यांच्या सौभाग्यवती सौ. मनीषा नवांगुळ यांनी माजी सैनिक संघटनेच्या वतीने, माजी सैनिकांच्या स्त्रियांसाठी आरोग्याविषयी मार्गदर्शन आणि आहाराविषयी मार्गदर्शन केले. सदर मार्गदर्शनाचा लाभ माजी सैनिकांच्या ५० ते ६० स्त्रीवर्गाने घेतला.
स्त्रियांच्या आरोग्यविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात आले. रोटरी क्लब, सावंतवाडीच्या या उपक्रमाचे माजी सैनिक संघटनेने आभार व्यक्त करून भविष्यात अशा समाजसेवी उपक्रमातून लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त असे विविध उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अध्यक्ष रो. डॉ. राजेश नवांगुळ आणि सेक्रेटरी रो. दिलीप म्हापसेकर यांनी समाधान व्यक्त केले.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

