आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्यास गती मिळेल – ॲडव्होकेट ओवेस पेचकर

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळुण : दि. ०७ शासनाने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाकडे अक्षरशः डोळेझाक केली आहे. कोकणातील लोकप्रतिनिधीही शांत आहेत. समृध्दी महामार्गाला हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यानंतर, मुंबई – नागपुर महामार्गाच्या कामाने प्रचंड वेग घेतला. या कामाच्या तुलनेत मुंबई – गोवा महामार्गाचे काम फारच रेंगाळले आहे.

त्यामुळे रखडलेल्या या कामाला गती येण्यासाठी या महामार्गाला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे. जेणेकरून या मार्गाकडे सर्वजण लक्ष देतील. अशी अपेक्षा चिपळुणचे सुपुत्र आणि उच्च न्यायालयातील वकील ओवेस पेचकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण आणि महामार्गाची झालेली दुरवस्था याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी काल शनिवारी गोवळकोट रोड येथे पत्रकार परिषद घेतली . यावेळी ॲडव्होकेट पेचकर यांनी या जनहित याचिकेविषयी माहिती देताना काही धक्कादायक बाबी उघड केल्या.

ते पुढे म्हणाले, मुंबई – गोवा महामार्ग एन. एच.६६ च्या अनिश्चित परिस्थितीवरुन प्रवास करताना उद्भवलेल्या समस्यांवर उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी यशवंत पंडित यांनी या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट तयार केले असुन, न्यायालयाने या विषयी गंभीरपणे दखल घेतली आहे. हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यापुर्वी श्री. पंडित आणि आपण पळस्पे ते झाराप या चौपदरीकरणाच्या कामाचे पुर्णतः सर्व्हेक्षण केले. यामध्ये कामात बऱ्याच त्रुटी आढळुन आल्या. ठेका घेतलेल्या कंपन्यांनी शासनासोबत केलेल्या कराराप्रमाणे काम केलेले नाही. अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा ठेका रद्द व्हावा, अशी मागणी आपण केली आहे.

येत्या १० मार्च रोजी त्यावर दुसरी सुनावणी होणार आहे. त्यासाठी न्यायालयाने हे प्रकरण विशेष यादीत समाविष्ट केले आहे. मात्र राज्य सरकार, ठेकेदार कंपनी याविषयी आजतागायत गंभीर नसल्याने, कोकणच्या जनतेला महामार्गावरून जाताना खड्डयांतुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

मुंबई – बेंगलोर मार्गाने वाहने वगळुन कोकणची लाईफलाईन असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाविषयी अपप्रचार केला जात आहे. ज्या कोकणाने शिवसेनेवर भरपुर प्रेम केले, सर्वाधिक आमदार त्यांचे कोकणातुनच जातात. सध्या उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तरीदेखील ते कोकणातील या रखडलेल्या महामार्गाबाबत काहीच बोलत नाहीत. एकीकडे या महामार्गाचे रखडलेले काम, रस्त्यावर पडलेले खड्डयांनी कोकणी जनता त्रस्त झालेली असतानाच व महामार्गाचे काम पुर्णत्वास गेलेले नसतानाही टोलनाके उभारणीकडे मात्र विशेष लक्ष दिले जात आहे, अशी खंतही ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी त्यांनी व्यक्त केली.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!