कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◾ बनावट कगदपत्रे तयार करून जमीन विक्री केल्या बाबत देवरूख नगरपंचायतीमधील भाजपा नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

🖥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि-०७ :-  बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री केल्याच्या आरोपावरून देवरूख नगरपंचायतीमधील भाजपा नगरसेवक संतोष कृष्णा केदारी यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरचे गंभीर प्रकरण जमीन मालकाने उघडकीस आणल्याने नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राऊंडची जागा खरेदीही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे . देवरुखमधील अनेक त्रस्त नागरिक त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.अनेकजण त्यांच्याकडे थकीत व्यवहार पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.मुरादपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील जमीन मालक दत्ताराम गुणाजी बांडागळे यांनी या गंभीर प्रकाराची तक्रार देवरूख पोलीस स्थानकात नोंदविली आहे . श्री.बांडागळे यांची मुरादपूर गावी सर्वे नं .१० मध्ये कुळवहिवाटीची जागा आहे . देवरुख नगरपंचायतीमधील भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल दि .१ जानेवारी २०११ ते दि .३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत पाच आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून श्री.बांडागळे यांच्या मालकीची जागा लाखो रुपयांना विकली आहे . नगरसेवक संतोष कृष्णा केदारी यांच्यासह मानसी मनोहर पोकळे ( स.कांदिवली ) , अश्विनी अजित जोशी ( रा.भाईंदर ) , अनघा अजित घाणेकर ( रा.कराड ) , रचना अमित वाटवे ( रा.आकुर्डी – पुणे ) या पाच जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून आपल्या मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे श्री.बांडागळे यांनी देवरूख पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे . गंभीर प्रकाराची माहिती मिळताच श्री.बांडागळे यांनी वरील पाचही जणांना याचा जाब विचारला . पाचही जणांनी वस्तुस्थिती सांगण्याऐवजी श्री.बांडागळे यांना दमदाटी करून विषय मिटविण्याचा अनपेक्षित प्रयत्न केला . श्री.बांडागळे यांच्या तक्रारीवरून देवरूख पोलीस स्थानकात वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . देवरूख नगर – पंचायतीच्या डंपिंग ग्राऊंडसाठी फक्त २० गुंठे जागा आवश्यक असल्याचे रत्नागिरीहून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्रातील जाहिरातीत नमूद करण्यात आले होते . कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करून ३८४ गुंठे जागा यासाठी खरेदी करण्यात आली आहे . सदरची जागादेखील नगरसेवक संतोष कृष्णा केदारी यांच्या मालकीची असल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले आहे . मूळमालकांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या होत्या , सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी डंपिंग ग्राऊंडचे गंभीर प्रकरण तडजोडीने मिटविले आहे . मुरादपूरप्रमाणेच डंपिंग ग्राऊंडच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची संगनमताने विक्री केल्याची शक्यता आता उघडपणे वर्तविली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!