◾ कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार प्रभाकर धुरी यांची निवड…
◾ निवड झाल्याने सर्व स्तरावरून धुरी यांचे होत आहे अभिनंदन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग दि-०७:- कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार प्रभाकर धुरी यांची निवड करण्यात आली. आविष्कार फाऊंडेशन (इंडिया)चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी धुरी यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले.’आविष्कार’चे जिल्हाध्यक्ष तथा निवड समितीचे सूचक अप्पासाहेब हरमलकर यांनी त्यांचे नाव सुचवले.संस्थेच्या विस्तारवाढीसाठी धुरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आविष्कार फाऊंडेशन (इंडिया) ही संस्था गेली चौदा वर्षे सामाजिक, शैक्षणिक,कला, क्रीडा, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे काम करत आहे.राज्यभरासह देशातील अनेक राज्यात या संस्थेचे काम जोमाने सुरु आहे. संस्थेचे अनेक सभासद आणि हितचिंतक परदेशातही आहेत. येत्या काळात संस्था आपल्या कामाचा डोलारा विदेशातही उभा करणार आहे.त्या पार्श्वभूमीवर धुरी यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

