◾ युवासेना चिपळूणचा ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळवून देण्यासाठी अभिनव उपक्रम
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-०७:- युवासेना चिपळूण तर्फे शहरातील ज्या व्यक्तीचे वय ६० वर्षपेक्षा अधिक आहे व ज्या व्यक्तीना कोरोना प्रतिबंधक लस घ्यावायची आहे , त्या लोकांना लस घेणेसाठी नोंदणी संदर्भात ऑनलाइन प्रकारचे सर्व सहकार्य केले जाणार आहे. सदर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून हॉस्पिटल ची वेळ घेऊन लस उपलब्ध करून देण्यासाठी युवासेना प्रयत्न करणार आहे .सदर नोंदणी काही लोकांना ऑनलाईन पद्धतीने करणे अवघड जात आहे . तरी कोरोना लस संदर्भात कोणाला नोंदणी करावयाची असेल त्यांनी आपले आधारकार्ड घेऊन सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवसेना शाखा वडनाका येथे यावे.सदर व्यक्तींना विनाशुल्क कोरोना लस संदर्भात नोंदणी करून हॉस्पिटलची वेळ घेऊन देण्यात येईल.असे आवाहन युवा सेना चिपळूण तर्फे करण्यात आले आहे.यासाठी आधारकार्ड वरील जन्मतारीख १९६१ किंवा त्या पूर्वीचे असेल अशाच लोकांची नोंदणी केली जाईल . तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी येताना आपला मोबाईल घेऊन यावे असे देखील कळविण्यात आले आहे .निहार कोवळे शहर प्रमुख ,विनायक रेडीज आयटी सेल अधिकारी , पार्थ जागुष्टे ,ओंकार नलावडे ,विनोद पिल्ले, अमेय चितळे उपशहर प्रमुख,सौरभ कदम कॉलेज कक्ष प्रमुख आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत आहेत.

