◾ हत्ती हल्ल्यात जखमी शेतकऱ्याला वन विभागाकडून तातडीची आर्थिक मदत..
◾ जिल्हा उपवनसंरक्षक एस. डी. नारनवर यांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट घेऊन केली विचारपूस..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०७ :- दोडामार्ग तालुक्यात हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची आज गोवा बांबोळी येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या मोर्ले येथील शेतकरी विश्वनाथ सुतार यांची जिल्हा उपवनसंरक्षक एस. डी. नारनवर यांनी विचारपूस करून त्यांना वनखात्याकडून तातडीची आर्थिक मदत केली.
सुतार यांच्यावर काल संध्याकाळी हत्तीने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यांनतर संतोष मोर्ये, गोपाळ गवस यांनी व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मोर्ले येथून दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात हलविले होते. यावेळी त्यांना गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दोडामार्ग मधून गोमेकॉत हलविण्यात आले होते.
तेथे ते उपचार घेत आहेत. त्यांची आज नारंनवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी सोबत वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, शिवसेना उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, कोनाळ वनपाल एस. एम. शिरवलकर, वनरक्षक श्री कुडल आदी उपस्थित होते. यावेळी गोपाळ गवस यांनी या जखमीला वनखात्याने आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशानुसार वनखात्याने पन्नास हजारांचा धनादेश जखमीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याची माहिती गोपाळ गवस यांनी दिली आहे. ही मदत तात्काळ स्वरूपात असून वैद्यकीय उपचारासाठी आणखी मदत लागल्यास ती मदत वन विभागामार्फत केली जाईल असेही आश्वासन यावेळी उपवनसरक्षकांनी दिले असल्याचे श्री. गवस यांनी स्पष्ट केले आहे.

