Sunday, October 11, 2026
Latest:
आणखीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

दक्षिण कोकणची काशी म्हणुन प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा आणि नवसाला पावणारी भराडी देवीची जत्रा यावर्षी साध्या पद्धतीने – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴ओरोस : दि. ०४ दक्षिण कोकणची काशी म्हणुन प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा आणि नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. याठिकाणी केवळ देवस्थान कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे या यात्रा स्थळी नागरिकांनी गर्दी करून नये. आपली जबाबदारी समजुन आपल्या घरात राहुन मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा. असे आवाहन करतानाच यात्रा स्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवांचा उत्सव सुरू आहे. त्यात पुर्ण राज्याचे लक्ष असलेली आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली आंगणेवाडीची भराठी देवीची जत्रा ६ मार्च रोजी, तर दक्षिण कोकणची काशी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्री. देव कुणकेश्वरची यात्रा महाशिवरात्री अर्थात ११ मार्च रोजी संपन्न होणार आहे.

मात्र या दोन्ही जत्रा स्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, राज्यात वाढता कारोणाचा धोका पाहता. आंगणेवाडी आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बैठक घेत, या यात्रा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही देवस्थान कमिटनी या यात्रा रद्द करत, केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक विधी या देखील काही निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.

मात्र या यात्रा स्थळी भाविक व अन्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. यात्रा स्थळी जाणारे काही मार्ग सील करण्यात येत आहेत. दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या यात्रा स्थळी नागरिकांनी गर्दी करून नये. आपली जबाबदारी समजून आपल्या घरात राहुन मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा असे आवाहन केले आहे. तसेच यात्रा स्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यात्रा स्थळी गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झाल्यास ते योग्य नाही. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!