◾ साटेली-भेडशी बाजारात क्षय रोगा विषयावर पथनाट्य करून केली जनजागृती
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०४-: साटेली-भेडशी बाजारपेठेत आज क्षय रोगा विषयी जनजागृती केली. या वेळी त्यांनी दोन आठवड्यां पेक्षा जास्त खोकला,ताप येणे, वजनात घट,चक्कर येणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, थुंकितून रक्त येणे ही सर्व क्षय रोगाची लक्षणे सांगुन त्यांनी क्षय रोगा विषयी जनजागृती केली. अशी क्षय रोगाची लक्षणे आढळल्यास गावातील आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा. व आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावा असे त्यांनी पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. हे पथनाट्य साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातिल आशा स्वयंसेवकांनी सादरीकरण केले.

