विशेष घटक योजनेच्या निधी वापराबाबत कागदपत्र न मिळाल्यास १० रोजी रास्तारोको – सुशांत सकपाळ

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴खेड : दि. ०३ तालुक्यातील भडगाव आणि भरणे गावाच्या सीमेवर विशेष घटकांचा निधी वापरून बांधण्यात आलेल्या पुलाबाबत आम्ही तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना दि. ०३ फेब्रुवारी रोजी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयातर्फे निवेदन दिले होते. त्यानुसार दि.१५ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात संयुक्त बैठक झाली. मात्र या बैठकित तहसीलदार यांनी दिलेल्या आश्वासनप्रमाणे अद्याप आम्हाला या प्रकरणात शासनाकडे उपलब्ध कागदपत्र देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दि. १० मार्च पुर्वी कागदपत्र न मिळाल्यास उग्र आंदोलन रास्तारोर्को करण्यात येईल असा, इशारा रिपब्लिकन पार्टीचे कोकण संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांनी दिला आहे.

याबाबत दि. २ रोजी खेड तहसीलदार यांना पुन्हा निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती देताना श्री. सकपाळ म्हणाले, भरणे – भडगावमध्ये बांधलेला पुल विशेष घटक योजनेतुन बांधण्यात आला असुन, या पुलाचा मागासवर्गीय जनतेसाठी उपयोगच नाही. त्यामुळे मागासवर्गीय निधीवर डल्ला काही जणांनी मारला असुन. त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

या प्रकरणी तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केल्यानंतर, मुळ प्रस्ताव आणि मुळ मागणी अर्ज दि. २६ फेब्रुवारीपर्यंत प्रशासन आम्हाला देणार असे ठरले होते. या प्रकरणाशी संबंधीत असणारे संपुर्ण कागदपत्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमच्या समोर सादर करण्याचे तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी पत्राद्वारे आम्हांस कळविले आहे. मात्र त्यांनी अद्याप कागदपत्रे दिलेली नसुन दि. ०९ रोजी पर्यंत आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग खेड, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळुण, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी या
कार्यालयाकडे भरणे व भडगाव हद्दीवर विशेष घटक योजनेतुन बांधलेल्या पुलाविषयी उपलब्ध मुळ मागणी अर्ज, ठराव, प्रस्ताव व अन्य कागदपत्र आम्हाला मिळवे. ग्रामपंचायत भरणे यांच्याकडे त्याच विषयाचे मुळ मागणी अर्ज, ठराव व प्रस्ताव यांचे मुळ कागदपत्र मिळावे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी यांनी विषेश घटक योजने अंतर्गत पुलासाठी मंजुर केलेल्या प्रस्तावाचे संपुर्ण मुळ कागदपत्र मिळाले नाहीत. तर दि. १० पासुन तहसिल कार्यालय खेड येथे नाइलाजास्तव न्याय मागणीसाठी रास्ता रोको सारखे उग्र आंदोलन करण्यास भाग पडेल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रभारी सुशांत सकपाळ यांनी दिली आहे.

या उग्र आंदोलन प्रसंगी उदभवणाऱ्या परिस्थितीला आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!