अरेरावी करणाऱ्या वीज अधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील – नितेश राणे
▪️मायकल जॅक्सनच्या शोची करमाफी ठाकरे सरकार देते, मग सामान्य नागरिकांना विजबिलमाफी का देत नाही?
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव*
🎴कणकवली : दि. २२- पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी संघाने भेट घेतल्यानंतर, पालकमंत्र्यांनी विजतोडणीबद्दल मला विचारल्याशिवाय विजतोडणी करायची नाही. असा मारलेला डायलॉग फसवा आहे. पालकमंत्र्यांच्या या डायलॉगबाजीनंतरही आज सकाळी सिंधुदुर्गात विज अधिकारी विज तोडणी करत आहेत. पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला भीक न घालता वीज अधिकारी विज कनेक्शन तोडतायत. अरेरावी करणाऱ्या विज अधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील असा सज्जड इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला.
ठाकरे सरकार कोरोना काळात नुकसानभरपाई देऊ शकले नाही, त्यांचे मंत्रीही जनतेला फसवताहेत. कोरोना काळात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मायकल जॅक्सनच्या शोची करमाफी ठाकरे सरकार देते, मग सामान्य नागरिकांना विजबिलमाफी का देत नाही? असा संतप्त सवालही आमदार नितेश यांनी उपस्थित केला. मायकल जॅक्सन आणि ठाकरे कुटुंबाला एक न्याय आणि सामान्य जनतेवर अन्याय होत असेल, तर आम्ही जनतेच्या बाजुने आवाज उठवणार. दमदाटी करून विज कनेक्शन तोडलात, तर वीज अधिकाऱ्यांना कसा शॉक द्यायचा. हे भाजपा कार्यकर्त्यांना चांगले माहिती आहे. अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे लागले, तर जबाबदार आम्ही नाही. अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला गर्भित इशारा दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक बाबु गायकवाड,ऍड.विराज भोसले, किशोर राणे आदी उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_