Wednesday, August 12, 2026
Latest:
कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

सहाय्यक अभियंता यांच्याकडून फोंडा घाट पंचक्रोशीतील वीज ग्राहकांकडे वीजबिल वसुलीचा तगादा

 

▪️ ..जर पूर्ण वीज बिल भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची देण्यात आली धमकी

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :रविकांत जाधव*

*🎴कणकवली :* गेल्या तीन-चार दिवसात फोंडाघाट सहा. अभियंता आणि त्यांचा स्टाफ यांनी बाजारपेठेसह पंचक्रोशीतील वीज ग्राहकांकडे वीज बिल वसुलीचा तगादा लावला असुन, जर पुर्ण वीज बिल भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी ग्राहकांना देण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. कोरोना काळातील बिल सरासरीने काढल्याने आणि बँकांच्या व्याजदरापेक्षा जास्त दराने लावण्यात आलेली प्रत्येक बिलातील व्याजाची रक्कम, इतर आकार, शुल्क, माफ करावी आणि थकीत बाकीचे हप्ते ठरवुन द्यावेत अशी आग्रही मागणी प्रत्येक ग्राहकाकडुन होत आहे. अन्यथा वीज ग्राहकांना न्याय मागणीसाठी आंदोलन करणे भाग पडेल, असे इशारा वजा निवेदन फोंडाघाट व्यापारी संघाने ग्राहकांच्या वतीने सहा. अभियंता. फोंडाघाट, उपकार्यकारी अभियंता. कणकवली आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे.

सर्वप्रथम वीज मंडळाच्या अनागोंदी कारभारावर आणि कोविड-१९ टाळेबंदी, मार्च २०२० पासुन विज बिल माफी देण्याबद्दल आमदार नितेशजी राणे यांनी आवाज उठवला होता. वीज बिल खंडित करू नका असा इशाराही वीज मंडळाला दिला होता. टाळे बंदीमुळे अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यापार, उद्योग पूर्णपणे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० काळात पुर्णपणे ठप्प होते. त्यामुळे उद्योग, दुकानदार, वीज ग्राहकांचा आर्थिक स्रोत बंद होता आणि वापर अपरिहार्य असल्याने प्रचंड वीज देयकांना सामोरे जावे लागले. त्यातही वीज दरवाढ, सरासरी बिल आकारणी आणि प्रत्येक महिन्यात बँकांच्या दरापेक्षा जास्त दराने व्याज आकारणी होत असल्याने वीज बिले भरणे ग्राहकांना अशक्य झाले. मध्यंतरी वीज मंत्र्यांनी बिले माफीची घोषणा करून युटर्न घेतल्याने ग्राहकांनीही बिले माफ होतील या प्रतीक्षेत भरली नाहीत. त्यामुळे ग्राहकांना थकबाकीदार करून महावितरण अधिकारी वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन ग्राहकांना अधिक संकटात टाकत आहेत. काही ग्राहकांनी धमक्यांना घाबरून वीज बिले भरून कर्जबाजारी झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज चोरी होत नाही, वीज बिले वेळेवर भरली जात होती. अशा परिस्थितीत उदभवलेल्या गंभीर परिस्थितीकडे कोणाचेही लक्ष नाही. स्थानिक नेते यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. विरोधक ठोस भुमिका ग्राहकांना देण्यास असमर्थ असल्याचे ग्राहक, व्यापारी बोलुन दाखवित आहेत. त्यामुळे महावितरण कर्मचारी व ग्राहक यामध्ये वादावादी, संघर्ष होताना दिसत आहे .

व्यापारी संघाने वीज बिल भरण्यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र एप्रिल २० ते सप्टेंबर २०या कालावधीतील वीज बिलाची रक्कमच घ्यावी, इतर वीज आकारा व्यतिरिक्त आकारण्यात आलेले अन्य सर्व कर, शुल्क, व्याज तातडीने वजा करून माफ करावेत, अशी तीव्र मागणी करण्यात आलेली आहे. याकडे स्थानिक आमदार मा. नितेशजी राणे यांचे लक्ष वेधले आहे. तोपर्यंत कोणाही व्यापाराचे अथवा ग्राहकाचे वीज कनेक्शन खंडित करू नये अशी मागणी व्यापारी संघ फोंडाघाट यांनी संबंधित महावितरणला निवेदनाद्वारे दिली आहे. अन्यथा लोकक्षोभ घेऊन संबंधित संवैधानिक मार्गाने आंदोलनाचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे .त्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात ? याकडे पंचक्रोशीतील व्यापारी ग्राहक आणि जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!