आरोग्यकोकणवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

*▪️केंद्रशाळा खांबाळे नं. १ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर संपन्न*

 

*२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान तर ५० जणांची झाली रक्तगट तपासणी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴वैभववाडी :*
शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे वतीने केंद्रशाळा खांबाळे नं. १ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर संपन्न झाले.
यावेळी २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले व ५० जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन
भैरिभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमात कोरोना कालावधीत जिवाची पर्वा न करता गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या १५ *कोरोना योध्यांचा* शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व भैरी भवानी प्रतिष्ठान यांचे वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ पाचकूडे, पं. स. सदस्य मंगेश लोके. सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, माजी चेअरमन दीपक चव्हाण, माजी सरपंच विठोबा सुतार, माजी सरपंच सारिका सुतार, माजी उपसरपंच लहू साळुंखे, ग्रा. पं. सदस्य प्रविण गायकवाड, मंगेश उर्फ बंडू गुरव, अमोल चव्हाण, प्राजक्ता कदम, रसिका पवार, भारती बोडेकर, मुख्याध्यापक उत्तम पाटील, ग्रामसेवक जी. डी. कोकणी, व्यापारी महासंघाचे संजय लोके, टेक्निशियन प्रकाश तेली, आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबीरासाठी रक्तपेढी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे डॉ. राजेश पालव, हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, नितीन गावकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयेश पवार, अंबाजी पवार, सत्यवान सुतार, मेघनेश पवार, कमलेश पवार, रोहित पवार, छोटू गुरव, अक्षय पाटेकर, संतोष पवार, प्राची लोके, राज पवार यांनी मेहनत घेतली.रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रूपेश कांबळे यांनी मानले.
फोटो-*
*रक्तदान करताना शिवप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव यावेळी अतुल रावराणे, पल्लवी झिमाळ पाचकूडे, पं. सदस्य मंगेश लोके, सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, राजेश पडवळ आदी छाया संजय शेळके वैभववाडी

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!