▪️राजापूर शहरात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त
▪️राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी :अद्वैत अभ्यंकर
*🎴राजापूर:* राजापूर शहरातील खडपेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन १५ हजार ८९० रुपये किंनतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी अवैध दारु विरोधात मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत सातत्याने गावठी दारु धंदे व गोवा बनावट दारु धंद्यावर छापे टाकुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान राजापूर शहरातील खडपेवाडी येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला खब-यामार्फत मिळाली. यानुसार विभागीय उपायुक्त वाय.एम.पवार, अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथक व लांजा कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी मॅक्डाॅल १, इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की व इतर असा १५ हजार ८९० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य, लांजाचे निरिक्षक विक्रम मोरे, भरारी पथकाचे उपनिरिक्षक किरण पाटील, जवान निनाद सुर्वे, विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार यांनी केली. याप्रकरणी अक्षय अरविंद खटावकर (वय-२४), रा.खडपेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याच पद्धतीने गोवा बनावट व गावठी दारु धंद्यावर कारवाया सुरु राहतील असा इशारा उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी दिला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_