🛑देव घोडेमुखची कोंब्याची जत्रा २५ रोजी.
*🛑देव घोडेमुखची कोंब्याची जत्रा २५ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- २१:-* मातोंड पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच्च गण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो, अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे. विशेष म्हणजे,नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानची ख्याती सर्वदूर आहे.शरीराच्या कुठल्याही अवयवाचे दुखणे असेल तर येथे नवस बोलला जातो.हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते. देशभरातून भाविक नवस बोलण्यासाठी येतात. देवदीपावलीदिवशी मातोंड येथील ग्रामदैवत देवी सातेरी मंदिरात ‘मांजी’ बसते. त्यानंतर तीन दिवस मंदिरात जागर होतात. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुख जत्रोत्सवादिवशी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई देवतांना उपार केल्यानंतर गावकर व इतर मानकऱ्यांसह गावचा कोंब्याचा मान चाळ्यांना दिला जातो. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सायं. ६ च्या सुमारास मेळेकरी भूतनाथ व पावणाई अवसारासह खाली येतात. सातेरी मंदिराकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

