▪️छत्रपती शिवाजी महाराज जयंती पिंगुळी येथे उत्साहात साजरी…*
*कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व ठाकर आदिवासी कला केंद्र,पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती सोहळा संपन्न*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले -म्हापण :*
कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व ठाकर आदिवासी कला केंद्र,पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती पिंगुळी येथे साजरी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग माध्यमिक अध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री विजय मयेकर, कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री प्रशांत चव्हाण,उपाध्यक्ष श्री शिवदास मसगे,सहकार्यवाह श्री मायाप्पा पाटील, तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे तज्ञ सल्लागार श्री मारुती माने , पाट हायस्कूलचे शाळा प्रतिनिधी श्री सांगळे सर, आनंदा हाके,सत्कारमूर्ती श्री व सौ गणपतजी मसगे,श्री के पी परब सर व श्री भास्कर चव्हाण उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री प्रशांत चव्हाण,श्री विजय मयेकर व श्री मायाप्पा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मायाप्पा पाटील यांनी केले.
व्यासपीठावरून बोलताना श्री के. पी. परब सर यांनी कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या कार्याचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सन्मा.गणपतजी मसगे यांचा तालुका अध्यापक संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक
संघाचे कार्य आदर्शवत सुरू असून यापुढे आणखी भरभराट होईल. श्री शिवदास मसगे यांनी शिवाजी महाराजांसाठी ठाकर समाजाने केलेले कार्य उलगडूनदाखवले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री प्रशांत चव्हाण यांनी ठाकर आदिवासी कला केंद्राच्या ऐतिहासिक कामगिरी बाबत गौरवोद्गार काढले व तालुका अध्यापक संघाच्या पुढील कार्यवाही बाबत दिशा निर्देश दिले.
सूत्रसंचालन श्री आर. एन.ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विजय मयेकर यांनी केले.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_