कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघाची कार्यकारिणी निवड उत्साहात संपन्न*…*
*कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघाची कार्यकारिणी निवड उत्साहात संपन्न*…*
समीर चव्हाण*
*वेंगुर्ला-म्हापण*
*अध्याक संघाच्या कार्यकारिणीची निवड जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सन्मा. लक्ष्मण पावसकर सर यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ हायस्कूल येथे पार पडली
यावेळी व्यासपीठावर जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे संस्थापक सदस्य व कुडाळ हायस्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मा.अरविंद शिरसाट, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे धडाडीचे संघटक सन्मा.अजय शिंदे, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे उपाध्यक्ष व संघटनेत प्राण ओतणारे सन्मा. विजय मयेकर, कुडाळ तालुका कार्यवाह श्री मायाप्पा पाटील, तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री सुजित गंगावणे, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सन्मा. अनिल राणे व सचिव सन्मा. गजानन नानचे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्यासपीठाचे स्वागत जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय मयेकर यांनी केले.
व्यासपीठावरून बोलताना सन्मा.अरविंद शिरसाट यांनी भूतकाळाचा आढावा घेत संघटनेचे महत्त्व विशद केले. जिल्हा संघटक सन्मा.अजय शिंदे यांनी यापुढे आक्रमक धोरण स्वीकारून आपण आघाडीवर राहण्याचे संकेत दिले.सन्मा. गजानन नानचे यांनी अध्यापक संघ व शिक्षकेतर संघटना हे एकमेकांचे भाऊ असल्याचे सांगत यापुढे खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. पावसकर सर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वानुमते पाट हायस्कूलचे शिक्षक प्रशांत सहदेव चव्हाण यांची या अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मांडकूली हायस्कूलचे शिक्षक गिरीश वसंत सरवटे यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे कार्याध्यक्षपदी कुडाळ हायस्कूलचे शिक्षक सुजित सुरेश गंगावणे यांची वर्णी लागली तर कार्यवाह या पदाची जबाबदारी आवळेगाव हायस्कूलचे शिक्षक दशरथ तात्याबा काळे यांच्यावर सोपविण्यात आली तसेच सहकार्यवाह पदाची जबाबदारी लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणेचे शिक्षक मायप्पा रामू पाटील व न्यू इंग्लिश स्कूल ओरोसचे शिक्षक अशोक प्रल्हाद गीते यांना संयुक्त रित्या सोपविण्यात आली.
व्यासपीठावरून बोलताना सर्वच वक्त्यांनी श्री. विजय मयेकर यांच्या कार्यशील संघटन कौशल्याचे व तालुका अध्यापक संघात नवचैतन्य निर्माण केल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत चव्हाण यांनी केले व आभार श्री दशरथ काळे यांनी मानले.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

