मीत्रांना दिलेले उसणे दहा लाख रुपये परत करण्यास नकार दिल्यानंतर मनोहर प्रभाकर गावडे चिठ्ठी लिहून बेपत्ता
._*🛑मीत्रांना दिलेले उसणे दहा लाख रुपये परत करण्यास नकार दिल्यानंतर मनोहर प्रभाकर गावडे चिठ्ठी लिहून बेपत्ता*_
*🛑ओटवणे येथील नदीपुलावर आढळली कार.. आत्महत्या केल्याचा संशय*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :-१८ सप्टेंबर*
मित्रांना दिलेले दहा लाख रुपये परत मिळत नाहीत उलट ते तू काय ते करून घे अशी दादागिरी करतात म्हणून पोलीस स्टेशन चे दरवाजे ठोठावून उपयोग झाला नाही म्हणून अखेर आर्थिक देवघेवीच्या नैराश्यातून मनोहर प्रभाकर गावडे (३५) मूळ रा. चौकुळ-सद्ध्या रा. कारीवडे हा युवक चिठ्ठी लिहून बेपत्ता झाला आहे. त्यात त्याने बांदा पंचक्रोशीतील दोघांची नावे लिहून ठेवली असून दोघांची नावे खोडली आहेत. ओटवणे येथील नदीत परिसरात त्याचा शोध उशिरापर्यंत लागला नाही.
उद्या स्कुबा ड्रायव्हिंगचे पथक आणून नदीपात्रात शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
यावेळी पोलिसांनी म्हणावी तशी तपास यंत्रणा राबवली नाही, शोध घेतला नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली अशी नाराजी गावडेंच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावले यांनी पोलिस ठाण्यात भेट दिली व तपास योग्य पद्धतीने करा, अशा सूचना पोलिसांना केल्या आहेत.
मनोहर याने ओटवणे नदीपात्राच्या बाजूला गाडी उभी करून त्या ठिकाणी आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यानंतर तो काल रात्रीपासुन बेपत्ता आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा आज दिवसभर शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही, असे तपासी अंमलदार स्वाती यादव यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी राबवलेली शोध मोहीम ही वरवरची होती, खोलात जाऊन पोलिसांनी तपास केला नाही, त्याचा शोध घेतला नाही, अशी नाराजी त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबतची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांना दिली त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला. तसेच सखोल तपास करा, अशी मागणी केली. याबाबत पोलीस निरीक्षक कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले उद्यापर्यंत तपास सुरू आहे. संबंधित व्यक्ती नेमकी कुठे आहे, याचा आम्ही शोध घेत आहोत. त्यासाठी उद्या स्कुबा ड्रायव्हिंगला पाचारण करण्यात येणार आहे. घटना घडलेल्या काळात त्याच्या संपर्कात नेमके कोण आले होते, त्याने शेवटचा फोन कोणाला केला. चिठ्ठीतील ते दोन व्यक्ती कोण याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र याबाबत आपण अधिक बोलू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*