🛑दिव्यांग लाभार्थीसाठी १८ रोजी मालवण येथे शिबीर.
*🛑दिव्यांग लाभार्थीसाठी १८ रोजी मालवण येथे शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ३१:-* तालुक्यामधील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या वैश्विक ओळखपत्र (UDID card- Unique Disability Identity Card) ची पडताळणी करण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे सकाळी ११ ते सायं. ६.०० वा. पर्यंत शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरापूर्वी ज्यांच्याकडे वैश्विक ओळखपत्र व प्रमाणपत्र (UDID card) नाही, अशा लाभार्थीनी DID या पोर्टलवर UDID नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या www. swavlabancard gov. in या वेबसाईटवर फॉ र्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म लाभार्थी यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन भरण्यात यावा. सदर फॉर्म भरण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो, लाभार्थी यांची सही आवश्यक आहे. वेबसाईटवर ही नोंदणी करुन त्याची नोंदणी पावती १८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या वेळी घेऊन येणे आवश्यक आहे. मालवण तालुक्यामधील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांचे वैश्विक ओळखपत्र (UDID card Unique Disability Identity Card) ची पडताळणी करण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे सकाळी ११.०० ते सायं. ६.०० या वेळेत शिबिरामध्ये सर्व दिव्यांग लाभार्थीनी वैश्विक ओळखपत्र व प्रमाणपत्रासह समक्ष उपस्थितीत राहून तपासणी करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थीना दरमहा रु.१५०० एवढे अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. शासन निर्णयान्वये सदरचे अनुदान दरमहा रु.२,५०० एवढे करण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण विभागाकडील शासन परिपत्रकान्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID card Unique Disability Identity Card) हे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

