🛑म्हापण येथे १ पासून कार्तिकी एकादशी उत्सव.
*🛑म्हापण येथे १ पासून कार्तिकी एकादशी उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २९:-* येथील म्हापण खालचीवाडी विठ्ठल-रखुमाई मंदिरात १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी महाएकादशी साजरी करण्यात येणार आहे. ४ रोजी खालचीवाडी येथील, तर ५ रोजी वरचावाडा येथील टिपर उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
१ रोजी उत्सवाला प्रारंभ होत असून सकाळी ‘श्रीं’चा पूजाविधी, रात्री ८ वाजता पुराण वाचन, ९ वाजता कीर्तन-चिंतामणी सामंत (शेळपी), २ रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त सकाळी वाजता एकादशणी, अभिषेक व महापूजा, आरती, रात्री ८ वाजता पुराण वाचन, ९.३० वाजता जगन्नाथ सामंत (शेळपी) यांचे कीर्तन, नंतर भजनसेवा, ३ रोजी पहाटे ४ वाजता खोत मंडळी यांचे भजन व काकड आरती, सकाळी पूजाविधी, रात्री ९ वाजता अनन्या ठाकुर हिचे कीर्तन, ४ रोजी सकाळी ‘श्रीं’ची पूजा, धार्मिक विधी-अभिषेक, महापूजा, आरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता शांतादुर्गा मंदिरातून श्री देवी शांतादुर्गा श्री देव सिद्धेश्वरची पालखी वाजत-गाजत, रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या दिवे व विद्युत रोषणाईतून विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करेल. १२.३० वाजता विठ्ठल मंदिरात श्री देवी शांतादुर्गा व सिद्धेश्वरच्या पालखीचे आगमन होईल. देवतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. त्यानंतर श्री देवी शांतादुर्गा व श्री देव सिद्धेश्वराचे पूजन, त्यानंतर श्री सरस्वती ग्रंथपूजन व वाचन, रात्री १.१५ वाजता विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, ५ रोजी पहाटे ४ वाजता जगन्नाथ सामंत यांचे (शेळपी) कीर्तन, ५ वाजता प्रभूकोचरेकर मंडळी यांची लळीत सेवा, सकाळी ९.३० वाजता गोपाळकाला, पारंपरिक खेळ, दुपारी १ वाजता महाआरती, गाऱ्हाणे, नंतर पालखी शांतादुर्गा मंदिराकडे प्रस्थान करणार आहे.
५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वरचावाडा येथील ‘टिपर’ होणार आहे. रात्री ९ वाजता देवी शांतादुर्गा मंदिरातून देव सिद्धेश्वर-शांतादुर्गेची पालखी सिद्धेश्वर मंदिर, बाजारपेठमार्गे ब्राह्मण मंदिरात जाणार आहे. ब्राह्मण मंदिरात धार्मिक विधी झाल्यानंतर पुन्हा शांतादुर्गा मंदिराकडे प्रस्थान करणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

