कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली रुग्णालयात ४ रोजी दिव्यांग नोंदणी शिबीर.

*🛑कणकवली रुग्णालयात ४ रोजी दिव्यांग नोंदणी शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाभ देण्यात येत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी कार्ड काढणे तसेच पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे ४ नोव्हेंबर रोजी दिव्यांग नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे अनुदान हे यापूर्वी प्रति महा रुपये १५०० एवढे होते. आता ते रु.२५०० एवढे प्रतिमहा करण्यात आलेले आहे.

कणकवली तालुक्यामध्ये एकूण १०८३ दिव्यांग लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ७१७ UDID कार्ड असलेले लाभार्थी असून ३६६ UDID कार्ड नसलेले लाभार्थी आहेत.

केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभमिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र -( UDID ) हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच सर्व दिव्यांग लामार्थ्यांची पडताळणी करून त्यांची पात्र/अपात्रता तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

त्यानुसार जिल्हयातील दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांची UDID card काढून घेणे व इतर लाभार्थी यांनी देखील सदर शिबीरादिवशी उपस्थित राहून आपलेकडीत UDID card ची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संयुक्तरित्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडून लाभसुरु असलेल्या लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन दिव्यांग UDID नोंदणी तसेच पडताळणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!