🛑शासनाकडून सरसकट नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी.
*🛑शासनाकडून सरसकट नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* मागील काही दिवस चालू असलेल्या पावसाने येथील शेतकऱ्यांच्या भातपीक व भुईमुगांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासनस्तरावरून जमिनी व ७/१२ च्या निकषाच्या अटी शिथील करून सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्याऱ्यांनी केली असून या मागणीचे लेखी निवेदन लवकरच शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
मागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी चालू असून मालवण तालुक्यातही पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेली भातशेती पूर्णतः तयार होऊन कापणीयोग्य झाली असताना अतिपावसामुळे भात कापण्यास शेतकऱ्यांना विलंब होत आहे. यामुळे काही भागात कापलेली भातशेती १० ते १५ दिवस पाण्याखाली राहिल्याने भात लोबीना फुटवे (कोंब) येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताबरोबरच गवतही कुजून भविष्यात शेतकऱ्यांच्या गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भातशेतीबरोबरच मागील काही वर्षे येथील शेतकरी भुईमूग पीकही मोठ्या प्रमाणात घेत असून सध्या तयार झालेल्या भुईमूग शेंगा अतिपावसाने जमिनीतच रुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काढणीयोग्य झालेल्या भुईमुगावर पुढील प्रक्रिया होत नसल्याने काढलेल्या शेंगाही वाळत नसल्याने त्यांना बुरशी धरून आतील दाणा खराब होत आहे. यातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मालवण तालुक्यातील ग्रामीण भागाचा विचार करता, येथे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर फार कमी प्रमाणात जमिनी आहेत. दुसऱ्यांच्या जमिनी घेऊन खंड स्वरूपात शेतकरी त्या जमिनीत शेती करतात. यामुळे नुकसान भरपाईचा विषय आल्यावर एकतर शेतकऱ्यांकडे त्या जमीन क्षेत्राचा ७/१२ नसतो. तसेच ७/१२ हा मूळ मालकाच्या नावावर असल्याने नुकसान भरपाईसाठी मूळ मालक तयार नसल्यास व उपलब्ध नसल्यास त्या क्षेत्रात शेतकऱ्याची शेती असून नुकसान होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने शासनाने प्रत्येक गावात शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी करून ७/१२ व इतर निकष बाजूला ठेवून शासनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

