कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑दिवाळीत वीज गायब; महावितरणचा भोंगळ कारभार उघड; महावितरण कंपनी विरोधात महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा.

*🛑दिवाळीत वीज गायब; महावितरणचा भोंगळ कारभार उघड; महावितरण कंपनी विरोधात महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* गणेशोत्सवानंतर दीपावलीमध्येही वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिव्यांचा सण अंधारोत्सव म्हणून साजरा करण्याची पाळी सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांवर आली. सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यांची रोषणाई उजळली नाही. ही परिस्थिती सातार्डा पंचक्रोशीसह मळगाव आणि सावंतवाडी तालुक्यातील सर्वाधिक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत होती. काही भागांमध्ये अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यांचा सण म्हणून दीपावली साजरी होत असताना सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गाव मात्र दोन दिवस अंधारात होता. अगदी मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली.

वीज महावितरण कंपनीकडून सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होतो, याचीच पुनरावृत्ती झाली. सोमवार, २१ ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेआठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला. मात्र, मंगळवार, २२ ऑक्टोबरला पुन्हा सायंकाळी ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सात वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा रात्री दहा वाजताच्या सुमारास सुरळीत झाला.

तक्रार करायची कुणाकडे? सावंतवाडी तालुक्यातील चौदा गाव वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी जोडण्यात आलेले आहेत.यामध्ये सातार्डा,आरोंदा,मळेवाड,आजगांव,कोंडूरे,तळवणे,कवठणी,किवळे आदी गावांचा यात समावेश आहे, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कॉल केल्यानंतर ते कॉल घेत नाहीत. महावितरण कंपनीने दिलेले मोबाईल नंबर स्विच ऑफ करून ठेवतात, अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. याकडे लक्ष कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असा सवाल वीज ग्राहक करत आहेत.

कार्यालय बदलाची मागणी दुर्लक्षित सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सावंतवाडी उप अभियंता कार्यालयाला जोडण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आला होता, मात्र अद्यापही हे गाव वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाशी जोडण्यात आलेले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय वाढत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

*वीज खंडित होण्यामुळे संतप्त; सातार्डा पंचक्रोशीत ‘मेणबत्ती मोर्चा’चा इशारा*

 

सातार्डा पंचक्रोशीमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या वीज ग्राहकांच्या वतीने आता महावितरण कंपनीच्या विरोधात ‘मेणबत्ती मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातार्डा ग्रामपंचायत माजी सरपंच उदय पारिपत्ते यांनी हा इशारा दिला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

वेंगुर्ला वीज महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये वीज समस्यांकडे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप उदय पारिपत्ते यांनी केला आहे. पारिपत्ते यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून काही अधिकारी एकाच पदावर आणि एकाच खुर्चीवर बसून असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे.

त्यामुळे हे अधिकारी वीज ग्राहकांचे कॉल घेत नाहीत आणि त्यांच्या तक्रारींकडेही लक्ष देत नाहीत. सणासुदीच्या काळातही वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ महिलांच्या सहभागाने ‘मेणबत्ती मोर्चा’ काढण्याचा इशारा पारिपत्ते यांनी दिला आहे.या इशाऱ्यामुळे वेंगुर्ला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!