🛑 ज्येष्ठांच्या गाण्यांनी उजळली कोजागिरीची रात्र
🛑 सालईवाडा ज्येष्ठ नागरिक केंद्रात खळाळत्या उत्साहात कोजागिरी साजरी ; एकापेक्षा एक सुरेल गाण्यांनी रंगली मैफल
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२२:– सालईवाडा येथील ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी मिळून कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमातून ज्येष्ठांचा खळाळता उत्साह आणि कलागुणांचे अप्रतिम दर्शन घडले. सुंदरवाडीतील मोती तलावाच्या काठावर सादर झालेला हा कार्यक्रम तरुणांनाही तोंडांत बोटे घालायला लावणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात शाम निवेलकर यांनी “ॐकाराचे स्तवन” करून केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक सुंदर गाण्यांची मैफल रंगत गेली.
अर्चना वझे यांनी “जय शारदे वाघेश्वरी” ही प्रार्थना गायिली, डॉ. दीपक तुपकर यांनी बासरी वादन सादर केले. अच्युतम केशवम आणि कोरा कागज था यह मन मेरा या गाण्यांनी वातावरण भारावून गेले.
प्रदीप प्रियोळकर यांनी “तेरे बिन सुने नैन हमारे”, अण्णा देसाई यांनी “मा मुझे अपने आचलं में बिठाले”, तर चंद्रकांत राणे यांनी रामरक्षा सादर केली.
मंजिरी मुंडले यांनी “माणसाच्या जीवनाला अर्थ द्यावा” ही स्वरचित प्रार्थना म्हटली. मेघना राऊळ यांनी “पल पल दिल के पास”, आणि विदूल पाटकर यांनी प्रसिद्ध गायकांच्या शैलींचे विनोदी सादरीकरण करून सर्वांना हसवले.
वीणा दळवी यांनी यमन रागातील बंदिश गायिली. दीपाली फडके यांनी “रहते थे कभी जिनके दिल में”, श्रद्धा नाईक यांनी “एक धागा सुखाचा”, सुलभा टोपले यांनी “अखेरचा हा तुला दंडवत”, शिल्पा साळगावकर यांनी “फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार”, तर प्रकाश राऊळ यांनी “चलते चलते मेरे ये गीत याद रखना” ही गाणी सादर केली.
शाम निवेलकर यांनी “कानडा राजा पंढरीचा”, अध्यक्ष दिगंबर पावसकर यांनी “हे भोळ्या शंकरा”, आणि स्वाती बिद्रे यांनी “नेसली गं साडी चंद्रकला ठिपक्यांची” हे गीत सादर केले.
शेवटी ‘चंद्र’ ही मध्यवर्ती कल्पना ठेवून घेतलेल्या अंताक्षरी स्पर्धेने कार्यक्रमाला सुंदर शेवट मिळाला. सूत्रसंचालन शाम निवेलकर यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
ज्येष्ठांचा उत्साह, कलागुण आणि एकोपा यांचा संगम या कोजागिरी उत्सवातून अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाने सर्व उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

