आणखीकोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑 वर्षा”वर फडणवीस–राणे यांची स्फोटक बैठक! कोकण ते मुंबई, नव्या समीकरणांची चाहूल

🛑 दिवाळीच्या शुभेच्छा निमित्त झालेल्या भेटीत नेमके काय दडले ते लवकरच उलघडेल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२२:- अखेर अनेक तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची आज सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची भेट पार पडली. ही भेट दिवाळीच्या निमित्ताने “सदिच्छा भेट” म्हणून झाली असली, तरी तिच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय चर्चांमुळे राज्याच्या सत्तेच्या गणितात नव्या हालचालींची चाहूल लागली आहे.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे कोकणातील राजकारण, भाजपचे संघटनात्मक बळकटीकरण आणि राणे गटाच्या रणनीतीबाबतही या भेटीत महत्त्वाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपसाठी कोकण हे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असून, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस–राणे भेट ही केवळ औपचारिक नसून राजकीय “गेम चेंजर” ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
राज्याच्या राजकारणात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या संवादामुळे सत्तेच्या समीकरणात नवे रंग भरले आहेत. कोकणातील राणे ब्रँडची ताकद आणि मुंबईतील भाजपचे नेटवर्क — या दोन्हींचा संगम झाल्यास विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी निर्माण होऊ शकते, असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.‘वर्षा’वर दिवाळीचा नाही, राजकीय
आतषबाजीचा जल्लोष!
फडणवीस-राणे चर्चा : कोकणात नव्या समीकरणांची तयारी?
*सत्तेच्या समीकरणात हलचल, विरोधक गोंधळले*!
आता या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात कोणते नवे वारे वाहतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांत या चर्चेचे राजकीय पडसाद कोकणपासून मुंबईपर्यंत उमटण्याची दाट शक्यता आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!