आणखीकणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

असलदे ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामसाठी तालुक्यात प्रथम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१६: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या स्मृतिदिनी तालुका सुंदर गाव योजने अंतर्गत आज जिल्हास्तरावरून मान्यवर मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हयातील २०१८/१९ या आर्थिक वर्षाकरीत निवड झालेल्या ९ गावांचा सन्मान आज ओरस येथे होणार आहे. यात कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीचा समावेश असुन, या गावाचे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आज सकाळी ११ वा. हा पुरस्कार सोहळयाचे वितरण होणार असल्याचे संबधीत ग्रा.पं.ना कळविले आहे.
यात पुढीलप्रमाणे तालुका वाईज गावांचा समावेश आहे.
कुडाळ तालुका, कसाल, मालवण – मालोंड, देवगड-पावणाई, वेंगुर्ले मठ, दोडामार्ग-कुंब्रल. कणकवली – असलदे, वैभववाडी-नावळे, सावंतवाडी येथील दोन ग्रा.प.चा समावेश आहे. यामध्ये न्हावेली व इन्सुली या गावांचा समावेश आहे. तर २०१९/२० या आर्थीक वर्षामध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार कणकवली तालुक्यातुन ओटव गावाचा समावेश आहे.
कणकवली तालुक्यातील असलदे ग्रा.पं.चा १८/१९ याकरिता  स्मार्ट ग्रामसाठी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असुन, या पुरस्काराचे वितरण आज संपन्न होत असल्याने सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी.सावंत तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व सहकारी यांचे अभिंनदन होत आहे.

_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_

*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*

*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*

*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*

_*🤷🏻‍♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!