समस्त कदम मराठा परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय कुलसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१६: समस्त कदम मराठा परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय कुलसंमेलन रविवार १४ फेब्रुवारी रोजी गढीताम्हाणे, ता. देवगड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान तसेच देशभरातील कदम बांधव उपस्थित होते. या कुलसंमेलनात समस्त कदम कुलाचा इतिहास उलगडण्यात आला. तसेच यापुढेही समस्त बांधवांच्या सहकार्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
देशभरातील कदम मराठा समाजाला एकजुट करावे या हेतूने या राज्यस्तरीय कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी पहिले संमेलन श्री क्षेत्र तुळजापूर येथे तर दुसरे संमेलन गिरमी, ता. फलटण, जि. सातारा येथे झाले होते. तिसर्या संमेलनासाठी मराठा कदम परिवाराचे कोकणातील प्रमुख गाव असलेले गढीताम्हाणेची निवड करण्यात आली होती. सकाळी कदम बंधूंचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत श्री रहाटेश्वराचे दर्शन घेतले.
यानंतर संमेलनस्थळी कदम राजवंशीय ध्वजारोहण करण्यात आले. अल्पोपहारानंतर पारंपारिक गोंधळ कार्यक्रम झाला. त्यानंतर देशभरातून आलेल्या कदम बंधूंनी आपला व आपल्या गावाचा, कार्याचा स्वपरिचय करून दिला. दुपारी श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा समस्त कदम मराठा परिवार संघटनेचे अध्यक्ष अमरराजे कदम व चंदगड येथील इतिहास अभ्यासक सदानंद गावडे यांनी कदम कुलाचा इतिहास सांगितला. भारतातील कदम परिवारातील राजे व राजवटीचा इतिहास तसेच रामायण काळापासून पुढे महाभारत त्याचप्रमाणे भारतातील सातवाहन, गुप्त, मौर्य, कदंब, छत्रपती शिवाजी आदी प्रमुख राजवटींमध्ये कदम परिवारातील वीर पुरूषांनी केलेले कार्य विषद केले. कदम मराठा समाजातील कर्तृत्ववान बांधवांचा यावेळी कुलचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
या संमेलनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, रायगड, नांदेड, हिंगोली , विजापूर, बेळगाव, गोवा येथील कदम मराठा परिवाराचे बांधव उपस्थित होते. परिवाराचे अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, उपाध्यक्ष राजन कदम, उद्योजक संतोष कदम तसेच श्रेयश कदम, संजोग कदम व गढीताम्हाणे, रहाटेश्वर गावातील समस्त कदम बांधवांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय संमेलन घेण्याचा मनोदय.
या संमेलनात कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदम मराठा परिवाराचे जिल्हास्तरीय संमेलन घेण्याचा मनोदय व्यक्त केला. याबरोबरच आपल्या परिवारातील विद्यार्थी व बांधवांना विविध व्यवसायात, उद्योगात सहकार्य करण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन केले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

