आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गांधी सप्ताहानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; दारुबंदी कायद्याअंतर्गत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०५:- गांधी सप्ताह (दि. ०२ ते ०८ ऑक्टोबर २०२५) निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक सिंधुदुर्गकडून दारुबंदी कायद्याअंतर्गत छापेमारी मोहीम आणि वाहन तपासणी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आज सावंतवाडी परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दोन पंच व स्टाफसह सावंतवाडी येथे कारवाई करण्यात आली. या दरम्यान, हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची सेन्ट्रो झिंग कार (क्र. MH-15/BX-1580) आणि काळ्या रंगाची जीप कंपास (क्र. GA-03/Y-1363) ही वाहने थांबवून तपासण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमधून गोवा बनावटी मद्याचे विविध ब्रँडचे ४५ बॉक्स आढळून आले.

सदर मद्याचा बाजारभाव रु. ४,२९,०००/- असून जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनांची किंमत रु. १२,००,०००/- आहे. एकूण रु. १६,२९,०००/- किंमतीचा मुद्देमाल दारुबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय भिमराव बंडगर (वय ५०, रा. संजयनगर, मिरज, जि. सांगली) आणि गजानन दिनकर पाटील (वय ४९, रा. रुईकर कॉलनी, करवीर, जि. कोल्हापूर) या दोघांवर दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. जाधव आणि दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांनी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक व्ही. एन. कदम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे, जवान एस. एम. पाटील, पी. व्ही. भोसले, आर. आर. जानकर, के. टी. पाटील, आर. व्ही. शेटगे तसेच निरीक्षक आर. गुरव, दुय्यम निरीक्षक एस. पाटील (विटा) व त्यांचा स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील हे करीत असून, भरारी पथकाकडून यापुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!