आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बेरजेचे राजकारण — बदलण्याची गरज आणि कायमची धडधड

🛑 राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेला सिंधुदुर्गात बळकटी मिळणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-०५:- सिंधुदुर्गच्या नव्हे तर देशाच्या राजकीय रंगभूमीवर सतत चालणारी बेरजेची मांडावळ त्यासाठी वापरण्यात येणारी रणनीती ही केवळ शब्दरचना नाही, ती एक वास्तविक समस्या आहे. राज्याचे राजकारणात तर मागील चार वर्षात अनेक उलथापालथी झाल्या त्यामुळे अनेकांची झोप उडाली, झोपेतून डोळे चोळत उठलेले म्हणाले हे स्वप्न तर नाही ना? आणि स्वतःलाच चिमटा घेतला पण ते वास्तव होते व सत्तेसाठी केलेली बेरीज होती. ही सगळी उदाहरण द्यायचे एकच कारन माजी आमदार राजन तेली यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनेत केलेला पक्ष प्रवेश ..

विधानसभेच्या निवडणुकीत तिकीटाच्या तडजोडीत निलेश राणे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पाठविण्यात आले,नंतर सजू परब,दत्ता सामंत, संजय पडते आणि आता राजन तेली —ही फक्त नावे नाहीत तर नावांमागे असलेली सियासत, गटबाजी आणि सत्ता टिकवण्याची कला आपल्या जनजीवनावर किती परिणाम करते हे पाहण्यासारखे आहे ,राजकारणाचं वेगळं गणित हरणे किंवा जिंकल्याने सत्ता मिळाली — परंतु त्या मागचे नैतिकतेचे, निष्ठेचे, सामुदायिक बांधिलकीचे प्रश्न कुठे जातात? राजन तेली पराभूत झाले हे केवळ एखाद्या स्पर्धेचे फलित नव्हे, ते एक सामाजिक आणि राजकीय जिवणातील महत्वपूर्ण घटना आहे,एखाद्या विद्यार्थ्याला गणीतात शून्य गुण मिळाले व तो नापास झाला म्हणजे त्याला गणित येत नाही असे आहे का,? तर त्याचे उत्तर नाही असे येणार कारन गणितातील पेपर मध्ये भले त्याला शून्य गुण मिळाले असतील पण आयुष्यातील बरीच गणिते त्यांनी सोडविलेली असणार.

आज राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा होते,कीती पक्ष बदलले म्हणून टीका टिप्पणी केली जाते आमचा सवाल असा आहे की राजकीय पटलावर असे किती जण आहेत आपला पक्ष बुडाला तरी त्याच नौकेत बसून आपणही बुडायची वाट पाहतात होते, याचे उत्तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच माणसे? मग जे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले नाहीत त्यांना दुसऱ्या वर टीका करण्याचा नैतिक अधिकार पोहचतो काय तर त्याचेही उत्तर नाहीच असे येणार,हा ह्याच्या मांडीला मांडी लावून बसणार काय? असे बालीश प्रश्न कधीच विचारू नये कारन ते राजकारण आहे तिथे काहीही,केव्हाही, कसेही,कधिही काहीही घडू शकते त्यालाच राजकारण असे म्हटले जाते.

कोण कोणाला साथ देतो, कोण कोणाला सोडतो आणि का सोडतो,त्याची राजकीय निष्ठा हे तपासण्याचे क्षेत्र केवळ व्यासपीठावरच्या घोषणांनी नाही; ती खऱ्या अर्थाने लढाईची ताकद, लोकांसमोर उभे राहण्याची क्षमता आणि आपल्या कृतींच्या जबाबदाऱ्याचा स्वीकार यावर आहे. आज कुणी एकट्याने लढतोय, उद्या कोणी दुसरा येऊन तयार केलेले सर्व काही उचलून नेतो मग आपण आश्चर्य करतो की ह्या खेळात नैतिक अधिकार कोठे राहिला? परंतु प्रश्न असा आहे: जर राजकारणात खर्‍या वेळी नैतिकता आणि सामुदायिक उत्तरदायित्वांना बळ मिळाले तर होणार बदल किती खोलवर जाईल?याचा अभ्यास टीका कारांनी करने गरजेचे आहे

दत्ता सामंतपासून सुरू होणारी लोकल नेत्यांची साखळी,सत्ता टिकवण्यासाठी नव्हे तर अधिक बल शाली करण्यासाठी घेतलेले पक्ष प्रवेश हे सगळेच स्थानिक जीवनावर थेट प्रभाव टाकतात. राजकारण इतकं साधं नाही; हे एक सतत चालणारं नाट्य आहे ज्यात भावना, स्वार्थ,रणनीतीही ,एकत्र मिसळतात.निलेश राणे आमदार झाल्यानंतर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार निलेश राणे यांच्या वर विश्वास ठेवून झालेले पक्ष प्रवेश तदनंतर संजय पडते व अनेकांचे पक्ष प्रवेश आमदार निलेश राणे यांचे बहुआयामी नेतृत्व सिद्ध करते.

विशाल परब यांनी विधानसभेच्या निवडणुकीत लढवलेली अपक्ष निवडणूक,घेतलेली मते व त्या काळात त्याच्यावर केली गेलेली टीका व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप बंद असलेले परतीचे मार्ग असे असले तरी पक्षवाढी साठी विशाल परब यांना भाजपात दिलेला प्रवेश,त्यांच्याच नेत्यांनी केलेले जंगी स्वागत एवढेच सांगून जाते की राजकारणाची पाळे मुळे किती घट्ट व खोलवर गेलेली आहेत व याचे पुढील राजकारण्यांवर किती दूरगामी परिणाम होणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

विधान परिषद ही तेलींना राणेंमुळे मिळाली हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य असतानाही राजन तेली यांनी त्यावेळी राणेंची साथ सोडली ऐन निवडणुकीत त्यांनी एकाच दिवसात दोन पक्ष प्रवेश केले,त्यांनी त्यावेळी बेरजेचे राजकारण केले पण त्यात राजन तेली फसले..पुढे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले पुढची निवडणूक बदल हवा तर आमदार नवा ही टॅग लाईन घेऊन ते मैदानात उतरले,येथेही युतीत भाजपने दिपक केसरकर यांना साथ दिली शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी साठी तेली उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गेले, पुन्हा पदरी निराशाच आली,काही काळ ते शांत राहिले,त्याना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न झाला शेवटी सत्ते पुढे शहाणपण नाही व काम करणारा माणूस हातावर हात ठेवून बसू शकत नाही म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.हा प्रवेश केल्यावर टीका होणारच पण प्रत्येक टीका संयमाने कशी घ्यायची हे राजन तेली यांच्या कडून शिकावे.त्यांनी आपण आपण आमदार निलेश राणे व आमदार दिपक केसरकर यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यकर्त्याच्या पाठीशी कसे उभे राहवे,न होणारे काम कसे करावे हे राजन तेली यांच्या कडून शिकावे कारन ते खासदार नारायण यांच्या सोबत त्या वेळी सावली सारखे राहून ती कला नारायणराव राणे यांच्या कडून शिकुन घेतली आहे व त्याचाच उपयोग त्यांना राजकारणातील प्रत्येक वळणावर होत आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राजन तेली यांना मानणारा एक वर्ग आहे हे सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे त्याचा फायदा शिवसेना पक्षाला होईल एवढे मात्र निश्चित.शिवसेना पक्षालाही आपली पाळेमुळे सर्वत्र पसरावयची आहेत व त्यासाठी त्यांना त्या तोलामोलाची माणसे हवी आहेत,राजन तेली यांच्या रूपाने त्यांना ही संधी मिळाली हे मात्र निश्चित.

ही नुसती टीका नाही — ही एक आवाहन आहे.

राजकारणात जर पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा यांना जागा दिली गेली, तर स्थानिक पातळीवरील निर्णय, विकास योजनांचे रेखाटन, आणि लोकसभासद/विधायक यांच्या कामांमध्ये फरक दिसेल. राजकारण हे फक्त सत्ता राखण्याचे साधन नसावे — ते समाज बदलण्याचे काम करणारं स्वयंचलित यंत्र असावे. आणि त्यासाठी आवश्यक आहे मानसिकता

*निष्कर्ष म्हणून* — बेरजेचे राजकारण जर कायम व्हायचे असेल तर जनता आणि नेते यांच्यातील विश्वास घट्ट करणे गरजेचे आहे. राजकारणात, फक्त आश्वासनाने काम होत नाहीत.त्यासाठी जनतेच्या मनामध्ये घट्ट नात निर्माण करावं लागत.टीका टीपन्नी फक्त जनतेची करमणूक करु शकते मुळ प्रश्न जाग्यावरच राहतात.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!