कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑वैभववाडीत उबाठा सेनेला मोठा धक्का; तालुकाप्रमुख मंगेश लोकेसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

*🛑वैभववाडीत उबाठा सेनेला मोठा धक्का; तालुकाप्रमुख मंगेश लोकेसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ०४:-* वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा सुरुंग लागला आहे. तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करून मंत्री नितेश राणे यांना मोठी ताकद दिली. भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

या सोहळ्यात खांबाळे सरपंच प्राजक्ता प्रसाद कदम, खांबाळे विकास सोसायटीचे चेअरमन प्रविण गायकवाड, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावागावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे वैभववाडी तालुक्यात उबाठा सेनेची पायाभरणी कोलमडली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या वेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके म्हणाले की, “विकासाचा अजेंडा आणि जनतेसाठी काम करण्याची क्षमता ही फक्त भाजप आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे. गाव, तालुका आणि जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे.”

या पक्षप्रवेश सोहळ्यात खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, चेअरमन प्रविण गायकवाड, सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम वळंजु, माजी सरपंच गौरी गणेश पवार, माजी चेअरमन दिपक चव्हाण, माजी सरपंच संजय साळुंखे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या संध्या तेरसे, वैभववाडी भाजप अध्यक्ष सुधीर नकाशे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*“विकासासाठी झटणारे मंगेश लोके भाजपात – मंत्री नितेश राणे”*

वैभववाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय कार्य करणारे मंगेश लोके यांचा प्रवेश भाजपासाठी बळ देणारा आहे.

“त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कार्यक्षमता भाजपाला आगामी निवडणुकांत निश्चितच लाभदायी ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झालेला आहे,” असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!