🛑निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांसाठी उद्या मार्गदर्शन.
*🛑निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांसाठी उद्या मार्गदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०४:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या सर्वप्रकारच्या प्राथमिक शिक्षकांसाठी तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कार्यरत शिक्षकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपण जिल्हा परिषद शिक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा करतो. या सेवेच्या अखेरीस सेवानिवृत्त होताना व सेवानिवृत्त झाल्यावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे निवृत्त होताना आपली निवृत्ती प्रकरणे विहित वेळेत पूर्ण केली जात नाहीत. त्यामध्ये अडचणी निर्माण होतात व प्रत्येक शिक्षकाची कमालीची धावपळ होते. इतकेच नव्हे, तर काही त्रुटींमुळे शिक्षकाचा कोणताही दोष नसताना निवृत्तीनंतरसुद्धा शासनाने देऊ केलेले आर्थिक लाभ आपणास वेळीच प्रदान केले जात नाहीत. या सर्व बाबी विचारात घेऊन सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या व सेवानिवृत्त झांलेल्या शिक्षकांना सर्वप्रकारची किमान माहिती देण्यासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गाला सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी मार्गदर्शन करणार आहेत.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे होत आली तरी गटविम्याची रक्कम मिळत नाही. शासन निर्णयाप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम निवृत्ती दिनांकाच्या दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्याला मिळणे अत्यावश्यक असते. परंतु ती रक्कम मिळायला ६-६ महिन्यांचा कालावधी लागतो. निवडश्रेणीचा आदेश होऊन तीन वर्षाचा कालावधी उलटला तरी कार्यरत कालावधीची देयके अदा करण्यात येत नाहीत. याच कार्यक्रमात एक नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार असून त्याचीही माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, दिलीप कदम, सोनू नाईक, आनंद पेडणेकर, भानू तळगावकर, हरिश्चंद्र भिसे, स्नेहा लंगवे, शिल्पा गावडे, रमेश आर्डेकर, बाबू परब, मोहन जामसंडेकर, प्रेमप्रकाश नाईक, नंदकुमार राणे, विनायक उमर्ये, उत्तम राऊळ, सुनील चव्हाण यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
