पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्णयानंतर फुकाच्या श्रेयासाठी नगराध्यक्ष संजू परब यांची तिरडी आंदोलनाची भाषा; रुपेश राऊळ

▪️हिंमत असेल तर एक पाऊल तरी तिरडी आंदोलन करून दाखवावे; राऊळ यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.०३: बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे,ते कळताच फुकाच्या श्रेयासाठी नगराध्यक्ष संजू परब तिरडी आंदोलनाची भाषा बोलत आहेत. नगराध्यक्ष संजू परब यांनी हिंमत असेल तर एक पाऊल तरी तिरडी आंदोलन करून दाखवावे, असा इशारा आज शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला, आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही त्यामुळे रोखठोक उत्तर देऊ असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.

श्री. राऊळ म्हणाले, अलीकडेच झालेल्या जिल्हा नियोजन मध्ये पालकमंत्र्यांनी बांदा दोडामार्ग रस्त्याला मंजुरी दिली त्यामुळे महिन्याभरात या रस्त्याचे काम मार्गी लागणार हे समजल्यामुळे फुकाचे श्रेय घेण्यासाठी नगराध्यक्ष परब यांची ही उठाठेव असल्याची टीकाही राऊळ यांनी केली. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी लक्ष वेधले तेव्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी खनिज निधी ३३ लाख रुपयांचा आहे, त्यातून हा रस्ता प्रस्तावित केला आहे असे ते म्हणाले.

मागील दोन वर्षापासून रखडलेल्या बांदा दोडामार्ग रस्ता महिन्याभरात मार्गी लावा अन्यथा सत्ताधाऱ्यांची तिरडी काढू असा इशारा काल भाजपा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला होता त्याला आज रुपेश राऊळ आणि दोडामार्ग चे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
येथील आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयांमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

श्री राऊळ म्हणाले, गेल्या कित्येक दिवसापासून नगराध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांच्यावर खालच्या पातळीवर सुरू केलेली टीका दुर्दैवी आहे मुळात आमचे नेते जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत जे त्यांच्या नेत्यांना मागील पाच वर्षांत जमले नाही ते आमच्या नेत्यांनी करून दाखवले त्यामुळे खालच्या दर्जाची टीका करण्याआधी नगराध्यक्ष या नात्याने त्यांनी शहरवासीयांना दिलेला शब्द, वचन आणि आश्वासने आधी पूर्ण करावीत

नगरपरिषद निवडणुकीत कंटेनर थिएटर,बिओटी तत्वावर भाजी मंडई करण्याचे दिलेले आश्वासन संजू परब विसरले असतील पण जनता विसरली नाही.रवी जाधव यांनी सात दिवस केलेले उपोषण आणि भाजीविक्रेत्या महिलांनी त्यांच्याविरोधात उठवलेला आवाज यात अपयश आल्याने सैरभैर होऊन श्री.परब  वायफळ टीका करत आहेत. त्यांनी पुकारलेले तिरडी आंदोलन एक पाऊल तरी काढून दाखवावे, शिवसेनेची ताकद काय ही त्याच वेळी त्यांना दाखवून देऊ असा इशारा राऊळ यांनी दिला.

मुळात कोवीडमुळे सगळीच कामे ठप्प पडली होती त्यात बांदा दोडामार्ग रत्याचेही काम रखडले होते, अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत नियोजन सदस्य बाबुराव धुरी यांनी या रस्त्याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले, पालक मंत्र्यांनीही तात्काळ दखल घेत रस्त्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे महिन्याभरात रस्त्याचे काम मार्गी लावतील, हे माहीत झाल्याने त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल या हेतूने संजू परब आणि त्यांच्यासोबत असलेल्यानी हा खटाटोप केला, असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.

दोडामार्ग तालुकाप्रमुख श्री धुरी म्हणाले, कोरोना काळात विकासकामांचा अखर्चित निधी परत गेल्याने या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. मध्यंतरी खड्डे बुजवण्यासाठी ५४ लाख रुपये मंजूर झाले होते मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि मजूर उपलब्ध न झाल्याने काम राहिले मात्र कालच्या नियोजन सभेत लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया राबवून काम सुरू करा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे तिरडी आंदोलनाला सारखे कृत्य कोण करणार असतील तर ते शिवसेना खपवून घेणार नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता नांदावी यासाठी शिवसेना,आम्ही गप्प आहोत मात्र असे विपरीत काय घडले तर कदापिही शिवसेना गप्प बसणार नाही. आज पुरहानी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी बागायतदारांना प्रलंबित असलेले दोन कोटी ५० लाखाचे अनुदान प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरू आहे. मात्र सावंतवाडीत बसून कोण दोडामार्गच्या विकासाच्या गप्पा मारत असतील तर ते चुकीचे असून त्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याची आज काय परिस्थिती आहे हे आधी पाहावे आणि नंतरच आंदोलनाची भाषा करावी, असे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी म्हटले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!