सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत कौतुकाचा सोहळा..
▪️सभासदांकडून संचालकांचा अभिनंदनाचा वर्षाव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१४: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत ८३ टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात आजच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँका सभासदांनी गौरव केला. अभिनंदनाचा ठराव घेत बँकेच्या अत्याधुनिक कामकाज आणि पारदर्शक ते बाबत जाणकार सभासदांनी आपली मते मांडली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी आज झालेली सर्वसाधारण सभा एक कौतुकाचा वर्षाव सोहळा ठरला होता.
सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे संचालक विरुद्ध भाजप संचालक असे शाब्दिक युध्द रंगेल म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा भरगच्च सभासदांच्या उपस्थितीत झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून आज सकाळी ११ वाजल्यापासून सभासदांना मताचा अधिकार आणि सभागृहातील प्रवेशाबाबत ठराव एकत्रित करत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. शरद कृषी भवन येथे सकाळी बारा वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अनेक विषयावरून जिल्हा बँकेचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे सहकार क्षेत्रातील जाणकार मंडळी या सभेला उपस्थित होती. बँकेने कर्ज वसुली बाबत चांगला निर्णय घेतला आहे आणि वसुली ही चांगली असल्याने नाबार्डच्या ऑडिट अ वर्ग मध्ये या बँकेचा सातत्याने असलेला समावेश हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत करत असताना शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी केलेल्या विविध योजना, पशु उत्पादनासाठी बँकेने सुरू केलेल्या योजना कौतुकास्पद असल्याचे मत सर्व सभासदांकडून मांडण्यात आले. मालवणचे नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात आपल्या विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्याची दखल संपूर्ण सभागृहाने घेतली तसेच सहकारातील जानकार श्री. वारंग तसेच एम.के. गावडे आदींनी या वेळी मत व्यक्त केले. सभागृहांमध्ये अहवालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर माजी चेअरमन तथा विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार आणि बँक माजी संचालक अॅड.अजित गोगटे यांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र, त्यांनी सभागृहाच्या एकूण कामकाजात सहभाग न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. सर्वसाधारण सभेचे कामकाज झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेने जाहीर केलेले जीवनगौरव सहकार क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री. नाईक यांच्यासह बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी अध्यक्ष राजन तेली, अजित गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा बँकेत शासकिय ठेवी
राज्यातील ५ सहकारी बँकांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात सिंधुदुर्ग बँकेचा समावेश असून आता या बँकेत शासकिय नोकरदारांचे पगार आणि ठेवी ठेवण्यात येतील अशी माहीती अध्यक्ष सतीश सावंत यांनी सभागृहाला दिली. तसेच ज्या कर्जदारांना प्रोत्साहनपर रक्कम येत्या अर्थसंकल्पाच्या तरतूदीनंतर मिळाणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी समिती गटीत केली असून यापुढील काळात बँके जमीन खरेदी, घरखरेदीसाठी कमी व्याजदर आकरण्याबाबत सभासदांच्या सुचनेचा विचार करेल असे सतीश सावंत यांनी सांगितले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_