श्री कुर्लादेवी मंदिरात १६ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१४: श्री कुर्लादेवी मंदिर कुर्ली वडाचे भरड येथे १६ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे. या हरिनाम सप्ताह निमित्त ७ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री कुर्लादेवी जुने मंदिर ते श्री कुर्लादेवी नवीन मंदिर अशी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व गावातील भाविकांची हरीनाम टाळ, मृदुंगाच्या घोषात भव्य वारकरी दिंडी काढण्यात येणार आहे. दर दिवशी स्थानिक गावातील भजने पारंपरिक पद्धतीने १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहेत. त्याचप्रमाणे इतर बाहेरील गावातून भजने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम श्री कुर्लादेवी देवस्थान उपसमिती, कुर्ली, देवस्थानचे मानकरी, बारा पाच व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम करतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन राबविण्यात येणार आहेत. दैनंदिन धार्मिक कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्यात येणार आहेत. मास्क व सॅनिटायझर इत्यादी चा वापर करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व शासकीय नियमांचे पालन करून हरिनाम सप्ताह साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, असे कुर्ली देवस्थान उपसमिती, देवस्थान चे मानकरी, बारा पाच व कुर्ली ग्रामस्थ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

