भाजप आ.रविंद्र चव्हाण यांची ‘इन्सुली’त स्वागत नाटेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

▪️भाजपने डावलून सुद्धा अपक्ष निवडून येऊन पक्षाच्या बाजूने समर्थपणे उभे राहिल्याबद्दल केले अभिनंदन..

▪️भाजपच्या वतीने शिस्तीचा भंग करणाऱ्यांची यापुढे केली जाणार नाही गय; चव्हाण यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी :अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.१४: इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने जाणुनबुजून डावलले‌ गेल्यानंतर अपक्ष निवडून येऊन सुद्धा भाजप पक्षाच्या बाजूने समर्थपणे उभे राहिल्याबद्दल आज मुंबई भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी इन्सुली येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी श्री. नाटेकर यांची ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांना विरोधी बाकावर बसुन सुद्धा आपले तत्व न सोडण्याचा सल्ला दिला. असेच कार्य करत रहा! भविष्यात तुम्हाला भाजप पक्षाच्या वतीने मोठी संधी दिली जाईल. असेही आश्वासन श्री. रविंद्र चव्हाण यांनी दिले.

वरीष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशानुसार कारवाई झाली नसल्यामुळेही नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाच्या वतीने शिस्तीचा भंग करणाऱ्यांची यापुढे कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. असा इशारा आ.चव्हाण यांनी दिला.

यावेळी आ. रविंद्र चव्हाण यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार राजन तेली, भाजप बांदा शहर मंडळ उपाध्यक्ष सिद्देश पावसकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संदीप गावडे, माजगाव माजी सरपंच मंगेश राठवड, श्री. औदुंबर पालव, श्री. सूर्यकांत पालव, श्री. संतोष सावंत, श्री. स्वरूप नाटेकर आदी उपस्थित होते.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!