कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबात मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे मार्गदर्शन.

*🛑आजगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबात मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे मार्गदर्शन.*

 

*🛑आजगावचे काम पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले.*

 

*🛑सर्वांनी एकत्र येऊन अभियान यशस्वी करण्याचे केले आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येत असून.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत,आजगाव येथील प्राथमिक शाळा नंबर १ येथे या अभिनयाबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी विशेषतः जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर स्वतः उपस्थित राहून येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आणि सदरील अभियान हे उत्स्फूर्तपणे राबविण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानचा ,माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर तथा सावंतवाडीचे आमदार यांच्या विशेष प्रयत्नाने आजगाव गावात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी केसरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या अभिनयाबाबत माहिती देत,सर्वांनी एकत्र येत हे अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमात सदरील अभिनयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन करतानाचे थेट प्रेक्षपणं दाखविण्यात आले.

आजगाव येथील कार्यक्रमात बोलताना रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, हे अभियान म्हणजे एक उत्सव आहे आणि हा उत्सव समजून आपण सर्वांनी या अभियानात एकत्रित येऊन काम करायचं आहे.शासनाच्या योजना ह्या भरपूर असून त्या तळागाळापर्यंत पोहचत नाहीत याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.मात्र आता पासूनच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे अभियान आपला उत्सव, सण म्हणून आनंदाने साजरा करत या अभियानात भाग घेऊन आपल भांडण तंटे बाजूला ठेवून यशस्वीपणे राबवून गावच्या विकासाठी एकत्र या ,असे आवाहन केले तसेच गावातील कचरा,प्लास्टिक मुक्त करण्याबाबत मार्गदर्श केल. आरोग्य विषयक कोणकोणत्या उपाय योजना तसेच आरोग्याच्या समस्या सोडविण्या बाबत आपण उपयोजना करत असल्याचे सांगितलं.

सीइओ खेबुडकर यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत आजगावच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामस्थांसाठीच्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी खेबुडकर यांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या , संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दीपप्रज्वलनाने करण्यात आली .

यावेळी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमित मेश्राम,गट विकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडीचे वासुदेव नाईक,आजगाव सरपंच यशश्री सौदागर,उपसरपंच सुशील कामटेकर,तालुका समन्वयक अंकुश जंगले,कृषी अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी शुभदा कविटकर, आजगाव – धाकोरे ग्राम महसूल अधिकारी नागराज चंद्रपगोळ, मंडळ अधिकारी , आजगाव मंडळ कैलास गावडे, प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के,माजी केंद्र प्रमुख विलासानंद मठकर ,शिक्षक दत्तगुरु कांबळी,ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस उपस्थित होते.

कार्यक्रमात खेबुडकर यांच्या हस्ते घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात चावी तसेच आबा कार्ड देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी अधिकारी शुभदा कविटकर यांनी केले. तर आभार सरपंच यशश्री सौदागर यांनी मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!