🛑आंबोलीतील घरफोडीत ३० हजाराचा ऐवज लंपास.
*🛑आंबोलीतील घरफोडीत ३० हजाराचा ऐवज लंपास.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि- १८:-* आंबोली-कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठाशेजारी राहणाऱ्या रवींद्र तुकाराम पाटील (५४) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाली. यात सोने, चांदी आणि रोख रक्कम मिळून सुमारे ३० हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना २३ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान घडली. याबाबतची तक्रार पाटील यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात मंगळवारी दिली. यावेळी अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. आंबोली-कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठाशेजारी राहणारे रवींद्र पाटील हे आंबोली पब्लिक स्कूलमध्ये कामाला होते. त्यांनी तेथे जागा खरेदी करून स्वतःचे घर बांधले आहे. ते अधुनमधून गावी जात असतात. यावर्षीही ते गणपतीत २३ ऑगस्टला आपल्या कुटुंबासह गावी गेले होते. गणपती विसर्जन करून पुन्हा ते १६ सप्टेंबरला आपल्या कामतवाडी येथील घरी आले असता त्यांना स्वयंपाक रुममधील ग्रील कापलेले दिसले. त्यामुळे त्यांनी आत कपाटात पाहणी केली. त्यावेळी कपाटातील पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन चांदीच्या मूर्ती, चांदीची लहान मुलांच्या हातातील काकणे आणि पायातील वाळे आणि पाच हजार रुपये असा मिळून ३० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. खिडकीतून एक माणूस आतमध्ये येईल, असे ग्रील कापून चोर आतमध्ये शिरले. चोरीचा गुन्हा दाखल होताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार हवालदार संतोष गलोले, हवालदार लक्ष्मण काळे, रामदास जाधव, पोलीस नाईक गौरव परब, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला. चोरीची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी सावंतवाडी पोलीस
निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी माहिती घेतली. चोरांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळल्या जातील, असे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी चोरट्यांचा माग घेण्यासाठी डॉग स्कॉड आणि अंगुली मुद्रा तज्ज्ञ (ठसे तज्ज्ञ) यांना पाचारण करण्यात आले होते. तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार हवालदार संतोष गलोले करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

