कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑रायगड येथे २७, २८ रोजी निसर्गानुभव कार्यशाळा.

*🛑रायगड येथे २७, २८ रोजी निसर्गानुभव कार्यशाळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १७:-* जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्रातर्फे २७ व २८ सप्टेंबर रोजी निसर्गानुभव कार्यशाळा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, (तालुका माणगाव, जिल्हा रायगड) येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा उद्देश निसर्ग सहवासातून आनंद मिळविणे, कोकणच्या निसर्गाकडे शास्त्रीय दृष्टिक्रोनातून पाहायला शिकणे, जैवविविधता या संकल्पनेची ओळख करून घेणे, पर्यावरण जतन व संवर्धन याबद्दल विचार करणे हा आहे, असे या कार्यशाळेच्या संयोजकांनी कळविले आहे. प्रसिद्ध जैवविविधता तज्ज्ञ पार्थ बापट या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात, जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रांतर्गत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात विविध कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा व संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विविध वयोगटातील शालेय, महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, जैवविविधता संशोयक, पर्यावरण कार्यकर्ते व अभ्यासक यांच्यासाठी या केंद्रातर्फे विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

निसर्गानुभव कार्यशाळेचा कालावधी शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ पासून रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ पर्यंत असणार आहे. या कार्यशाळेत परिसर भ्रमंती (वृक्ष वेली, प्राणी-पक्षी यांची ओळख), निसर्ग खेळ / उपक्रम (जैवविविधता व माणूस यातील संबंध), पर्यावरण – संगीत (पर्यावरणाचे जतन संवर्धन), माहितीपट प्रदर्शन, चर्चा व गप्पांचा समावेश आहे. १२ ते ५५ वयोगटासाठी ही कार्यशाळा खुली आहे.

कार्यशाळेत मर्यादित जागा असून या निसर्गानुभव कार्यशाळेची नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी स्मारक कार्यालय ७७७६९३७८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!