🛑पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस रोज चालविण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची रेलमंत्र्यांकडे मागणी.
*🛑पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस रोज चालविण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची रेलमंत्र्यांकडे मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नवी दिल्ली, दि- १७:-* मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार व ऊर्जा विषयक स्थायी समितीचे सभापती श्रीरंग आप्पा बारणे यांनी रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देऊन रेल्वे गाडी क्रमांक 22149/22150 (पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस) ही गाडी आठवड्यातील सर्व दिवस चालविण्याची मागणी केली आहे.
सध्या ही गाडी पुणे ते एर्नाकुलम फक्त आठवड्यातून दोन दिवस (बुधवार व रविवार) तर परतीची सेवा एर्नाकुलम ते पुणे मंगळवार व शनिवार या दिवशीच उपलब्ध आहे. यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट मिळविण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. लांब प्रतीक्षा यादीमुळे प्रवाशांना महागडी हवाई सेवा किंवा इतर असुविधाजनक पर्यायांचा आधार घ्यावा लागतो, अशी खंत खासदार बारणे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड हे देशातील प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक व आयटी केंद्र असल्याने येथील शिक्षण, रोजगार, व्यवसाय व वैद्यकीय उपचारांसाठी दक्षिण भारतातून (केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश) मोठ्या प्रमाणावर प्रवासी येतात. त्याचप्रमाणे पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील मूळ गावे असलेल्या हजारो लोकांचा एर्नाकुलमकडे नियमित प्रवास असतो. सुट्ट्या, सण-उत्सव, विवाह समारंभ आदी प्रसंगी प्रवासी संख्या प्रचंड वाढते.
बारणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “पुणे-एर्नाकुलम दरम्यान सुमारे 1,285 कि.मी.चा प्रवास साधारण 24 तासांचा असून सध्या फक्त दोन दिवस सेवा असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही गाडी दररोज सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल तसेच भारतीय रेल्वेच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल.”
स्थानिक जनता व प्रवासी संघटनांनी यापूर्वीपासूनच ही मागणी सातत्याने केली आहे. आता खासदार बारणे यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न गांभीर्याने सोडवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

