कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सफाई कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष तीव्र : राजकीय नेत्यांवर जनतेचा अविश्वास- रवि जाधव.

*🛑सफाई कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष तीव्र : राजकीय नेत्यांवर जनतेचा अविश्वास- रवि जाधव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* गोरगरीब सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी बुडवला जाणे हा विषय केवळ कर्मचारीवर्गापुरता मर्यादित न राहता आता मोठा सामाजिक आणि राजकीय प्रश्न बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रश्नावर संघर्ष सुरू असूनही अधिकाऱ्यांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी ढवळाढवळ न करता दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या तीव्र आंदोलनाने पुन्हा एकदा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना जाग आणली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी या आंदोलनातून ठणकावले की, “यापुढे जनता कोणाला स्वीकारेल-नाकारेल हे नियती ठरवेल. परंतु गोरगरीब सफाई कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे संजू परब एवढे दिवस कुठे होते, हाही प्रश्न उपस्थित होतो.”

जाधव यांनी स्पष्ट केले की, “साफसफाई कर्मचारी हे मशीन नाहीत, ते जनतेचाच एक भाग आहेत. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, पोटापाण्याचा प्रश्न आहे. ज्यांनी त्यांच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा खाल्ला आहे, त्यांना शासन झाल्याशिवाय माघार नाही.”

*राजकीय पापं विसरणार नाही जनता*

गेल्या काही वर्षांत शहरातील सफाई कामगारांना थकवणारे तासन्‌तास काम करूनही त्यांचे हक्काचे पैसे न मिळणे, व्यापाऱ्यांना व नागरिकांना दिलेला त्रास, आणि प्रशासनाकडून केलेली बेपर्वाई या सर्वांचा ज्वालामुखी आता फुटत असल्याचे दिसते. रवी जाधव यांनी थेट इशारा दिला की, “नेत्यांनी उशिरा का होईना जागं होणं चांगलं आहे, पण जनतेला व कामगारांना दिलेला त्रास ही जनता कधीच विसरणार नाही.”

*पुढील आंदोलनाची हाक*

शहरातील जनतेला अनावश्यक त्रास होऊ नये म्हणून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा विचार प्रतिष्ठानकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, येत्या पंधरा दिवसांत सफाई कामगारांना न्याय मिळाला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

*पार्श्वभूमी* :

सावंतवाडी नगरपरिषद व सफाई कामगारांच्या वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचा वाद मागील तीन वर्षांपासून कायम आहे. विविध राजकीय गटांनी वेगवेगळ्या वेळेस या प्रश्नावर आंदोलने केली, परंतु ठोस निर्णय किंवा न्याय मिळालेला नाही. यामुळे कामगार वर्गामध्ये असंतोष वाढत असून, याचा फटका थेट शहरातील सामान्य नागरिकांना बसतो. आता या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेणे अपरिहार्य झाले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!