कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑“प्रश्न मार्गी लावण्यावर भर; वाळू चोरीला आळा घालणार” – गृह राज्यमंत्री योगेश कदम.

*🛑“प्रश्न मार्गी लावण्यावर भर; वाळू चोरीला आळा घालणार” – गृह राज्यमंत्री योगेश कदम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-*“महसूल, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न-औषध प्रशासन या माझ्याकडे असलेल्या चारही खात्यांचा तालुकानिहाय आढावा घेणार आहे. ग्रामीण जनतेशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी माझा अधिक भर राहील,” असा ठाम विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री कदम यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

*“केसरकरांच्या मार्गदर्शनाखाली काम”*

मंत्री कदम म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनंतर प्रथमच जिल्ह्यात आलो आहे. संघटना मजबूत करण्यासाठी केसरकरांच्या नेतृत्वाखाली हातभार लावणार आहे. अनुभवी नेते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रश्न मार्गी लावले जातील.”

*वाळू चोरीवर थेट भूमिका*

वाळू प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. क्रश सॅन्डचा पर्याय उपलब्ध आहे. नवीन वाळू धोरणाचा अवलंब का केला गेला, किती जणांवर कारवाई झाली याचाही आढावा घेणार आहे.”

*केसरकरांचा प्रतिसाद*

दरम्यान आमदार दीपक केसरकर म्हणाले, “आंबोली, चौकुळ, गेळेचा हा फक्त वन खात्याचा प्रश्न बाकी आहे. महसूल विभागाचा प्रश्न सुटला असून वरिष्ठ पातळीवर त्यावर काम सुरू आहे. तो लवकरच मार्गी लागेल.”

*मान्यवरांची उपस्थिती*

या वेळी केसरकरांकडून राज्यमंत्री कदम यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते संजय आंग्रे, अशोक दळवी, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!