🛑मंत्रीपदाच्या लढाईत सावंतवाडीचा हुंकार : केसरकरांशिवाय शिवसेना अपुरी!
*🛑मंत्रीपदाच्या लढाईत सावंतवाडीचा हुंकार : केसरकरांशिवाय शिवसेना अपुरी!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याने एका सत्याला पुन्हा उजाळा दिला – दीपक केसरकर हेच सिंधुदुर्गातील शिवसेनेचे मूळ बळ आहेत. सावंतवाडीत कदम यांच्या भेटीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी याचेच प्रत्यंतर.
“केसरकरांमुळेच सिंधुदुर्गात शिवसेना आहे, त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. पण आज पक्षाने त्यांना न्याय द्यायलाच हवा. मंत्रिपद द्या!” – महिला आघाडीच्या या आर्त मागणीने वातावरण भारावून गेले. अनारोजीन लोबो यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू म्हणजे केवळ भावनांचा उफाळा नव्हे, तर सिंधुदुर्गातील शिवसैनिकांच्या मनातील ठिणगी होती.
राज्यमंत्री कदम यांनी “एकनाथ शिंदे अन्याय करणार नाहीत, मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी देतील” असे सांगून परिस्थिती मऊ केली खरी; पण प्रश्न मात्र उभा राहतो – केसरकरांना मंत्रीपदापासून दूर ठेवणे हा न्याय आहे का?
सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांचे मनोबल, संघटनाचे अस्तित्व आणि पक्षाचा पाया हा केसरकरांवरच उभा आहे. त्यांना वारंवार वंचित ठेवणे म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आत्म्याशी खेळणे होय. आज सावंतवाडीतील हुंकाराने दाखवून दिले की – पक्ष नेते काहीही म्हणोत, जिल्ह्यातील शिवसैनिकांचा विश्वास केवळ दीपक केसरकरांवर आहे.
सत्ता समीकरणे वेगळी असतील, राजकीय समीकरणे वेगळी असतील; पण केसरकरांशिवाय सिंधुदुर्गात शिवसेना अपुरीच राहील.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

