शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पाडलोस ग्रामसचिवालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१३: पाडलोस ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून यासाठी आपण पंचायत समिती तसेच आमदार, खासदार यांच्यामार्फत अतिरिक्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, पंचायत समिती सदस्य रेश्मा नाईक यांनी दिले.

ग्रामसचिवालयाचे बांधकाम पाहणीदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर,   इंजिनीअर शिंदे आदी उपस्थित होते. ग्रामसभांना होणारी जागेची कमतरता, ग्रामस्थांना होणारी अडचण लक्षात घेऊन शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी पाठपुरावा करत जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून जि. प. सदस्य राजन मुळीक यांच्या सहकार्याने ग्रामसचिवालय मंजूर करून आणले. ग्रामसचिवालय पूर्णत्वास येण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनीही निधी देणार असल्याचे भूमिपूजनावेळी सांगितले. परंतु अजूनही निधीची आवश्यकता असल्याचे राजू शेटकर यांनी रेश्मा नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले.  त्यामुळे वरील अतिरिक्त निधी देणेसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन रेश्मा नाईक यांनी दिले.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!