संस्था आपल्या गावी; साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचा नवीन उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१३: संस्था आपल्या दारी हा नवीन उपक्रम सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत येथे हळवल गावाच्या दिव्यांग बांधवांना एकत्र करून यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली संस्था आपल्या दारी हा नवीन उपक्रम संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला गावच्या ग्रामसेविका सौ बिचकुले सदस्य जाधव राणे संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे संस्था जिल्हा प्रतिनिधी गुरुनाथ सामंत व भक्ती सामंत संस्था व्यवस्थापक नीलम राणे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमास हळवल गावचे पंधरापेक्षा जास्त दिव्यांग बांधव व त्यांचे पालक उपस्थित होते. हळवलच्या दिव्यांग बांधवांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी अनिल शिंगाडे यांनी हा उपक्रम घेण्यामागे उद्देश दिव्यांग बांधवांना गाव पातळीवर सुविधांचा लाभ घेता यावा व न्याय मिळावा हे पटवून दिले. उपस्थितांनी संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे व संस्थेचे आभार मानले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

