🛑तळेरे येथे महिलेच्या बॅगमधील दागिने, रोकड लांबविली.
*🛑तळेरे येथे महिलेच्या बॅगमधील दागिने, रोकड लांबविली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* कणकवली तळेरे बाजारपेठेत खरेदी करत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या बॅगेमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी वैशाली संतोष घाडी (४७, रा. देवगड-फणसगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. वैशाली घाडी या पती व मुलांसह मुंबई-सांताक्रुझ येथे राहतात. गणेशोत्सवानिमित्त त्या पतीसह ३१ ऑगस्ट रोजी मुंबईहून तळेरे येथे आल्या. त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये दागिने व पैसे होते.. तळेरे बाजारपेठेतून त्यांनी भाजी व अन्य साहित्य खरेदी केले. त्यानंतर वैशाली व त्याचे पती तळेरे-विजयदुर्ग या बसने देवगड येथील घरी गेले.घरी पोहचल्यानंतर वैशाली घाडी यांना बॅगेची चेन उघडी दिसली. त्यामुळे त्यांनी बॅगमधील साहित्य तपासले असता त्यामध्ये साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र, नथ व सुमारे आठ हजार रुपये नसल्याचे लक्षात आले. तळेरे बाजारपेठेत खरेदी करताना कोणीतरी अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत दागिने व पैसे लंपास केले असावे, अशी खात्री पटल्याने वैशाली यांनी पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. त्यानुसार अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

