🛑खारेपाटण येथे ६० हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त.
*🛑खारेपाटण येथे ६० हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०३:-* कणकवली,पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खारेपाटण कोष्टी आळी येथे छापा टाकून विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला ६०,४०० रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हवालदार अवधुत गुणिजन यांच्या फिर्यादीवरून प्रदीप विश्वनाथ निग्रे (५९, रा. खारेपाटण-कोष्टीआळी) व बंटी सावंत (रा. वरवडे) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री ८.३५ वा. च्या सुमारास करण्यात आली.
कणकवली पोलिसांना खारेपाटण येथील प्रदीप निग्रे यांच्या घराच्या पाठीमागे गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी निग्रे यांच्या घराच्या पाठीमागील बाजुस छापा टाकला. त्यावेळी प्रदीप निग्रे हे तीन किलतानाच्या पिशव्या घेऊन उमे होते. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीतील दारूच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.
सदरचा मुद्देमाल कोणी दिला, असे निग्रे यांना विचारले असता त्यांनी हा माल वरवडे येथील बंटी सावंत यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रदीप निग्रे व बंटी सावंत यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (ई), ८१, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मिलिंद देसाई करीत आहेत.
ही दारुसाठ्यावरील कारवाई पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार चंद्रकांत झोरे, अवधुत गुणिजन, पाडुरंग पांढरे, महिला पोलीस खरात यांनी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

