आपत्कालीनशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गवा रेड्याच्या हल्यात डींगणे येथील तरुण जखमी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१३: डींगणे येथील रमेश गोप वय ४५ वर्षे आपले काम संपवून घरी जात असताना डींगणे बाबरवाडी येथील रस्त्यावर अचानक गवा रेड्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले. डींगणे बाबरवाडी रोडवर नेहमी दिवसाढवळ्या गवा रेड्याचा कळप निदर्शनास येतात. काल सायंकाळी उशिरा याच मार्गावरून रमेश गोप आपले काम आटपून चालत घरी जात होते. अचानक मागाहून गवा रेड्यांचा कळप आला रमेश गोप यांना काळोखामुळे समजलाच नाही. या कळपातीलच एका गवा  रेड्याने रमेश यांच्या पायावर शिंगाच्या सहाय्याने हल्ला चढवला. या हल्यामध्ये रमेश यांच्या पायाला मोठी जखम झाली. अशा अवस्थेत रमेश हे आपला जीव वाचवत एक कीलोमीटर चालत गावात गेले. त्यांनी याची कल्पना डींगणे माजी सरपंच जयेश सावंत यांना दिली. यावेळी जयेश सावंत व डींगणे ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य क्रेंदात दाखल केले. त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांचे डाँ.जगदीश पाटील व डाँ मयुरेश पटवर्धन यांनी उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहीती मिळताच वनपाल सुतार यांनी आरोग्य केद्रांत येत जखमीची विचारपूस केली. या गवा रेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डींगणे ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!