दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मुळस-हेवाळे पुलासाठी करण्यात आलेले बेमुदत उपोषण अखेर साखळी पद्धतीने..

▪️सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांची माहिती; उपोषण कर्त्यांना भजन करत रात्र जागवली

*श🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१३: मुळस-हेवाळे गावाला जोडणारा पूल व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षे तेथील नागरिक प्रयत्न करत आहेत. परंतु संबंधित विभाग याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा उपोषणे केली गेली परंतु त्या उपोषणा वेळी आश्वासने देऊन देखील या पूलाचे काम इंच भरही झाले नाही. त्यामुळे आज सकाळ पासून तेथे बेमुदत उपोषण सुरू होते परंतु त्या बेमुदत उपोषणाचे रुपांतर साखळी उपोषण पद्धतीने करत असल्याचे तेथील उपोषणकर्ते दत्ताराम देसाई यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बांधकाम विभाग उपअभियंता विजय चव्हाण यांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रश्नांचा भिडीमार केला व जोपर्यंत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे वक्तव्य ग्रामस्थांनी उपअभियंता चव्हाण यांना केले.

रात्रीच्या वेळी उपोषण कर्त्यांनी भजन सुरू करून रात्र जागवली. मात्र पहिल्या दिवशी एकही लोकप्रतिनिधी या उपोषण स्थळी न गेल्याने उपोषण कर्त्यां मधून लोकप्रतिनिधींच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!