साटेली-भेडशीतिल नदी पात्रातील गाळ काढणे, संरक्षक भिंत बांधणे व सुशोभित करण्याबाबत कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना ग्रामस्थांचे निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : दोडामार्ग
🎴दोडामार्ग,दि.१३: साटेली-भेडशीतिल नदी पात्रातील गाळ काढणे, संरक्षक भिंत बांधणे व सुशोभित करण्याबाबत मा. कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग जिल्हा पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चराटे सावंतवाडी,व तहसीलदार दोडामार्ग यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या काही वर्षात साटेली-भेडशी नदीला मोठा पूर येऊन काही घरांना पाण्याचा वेढा पडतो भर पावसात घर सोडून स्वतः च्या घरात पाणी आल्यावर दुसऱ्याच्या घरात जावे लागते. साटेली-भेडशी खालचा बाजार येथील वासुदेव मुंज, निलेश तळणकर, संजय तांबे, शंकर गोलम इत्यादींच्या घरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी भरून घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
या चार पाच वर्षांमध्ये नदीली आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु एकही सरकारी अधिकारी पहाण्यासाठी किंवा पंचनामा करण्यासाठी आला नाही. संबंधित विभागाने पावसाळा येण्यापूर्वी नदी पात्र स्वच्छ करून सुशोभित करावे व तेथील ग्रामस्थांना जल समाधी मिळण्यापासून वाचवावे असे निवेदन साटेली-भेडशी ग्रामस्थां तर्फे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व तहसीलदार दोडामार्ग यांना देण्यात आले.या वेळी विष्णू मुंज व इतर साटेली-भेडशी ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
